चंदगड संक्षिप्त बातम्या

चंदगड संक्षिप्त बातम्या

‘महादेवराव बीएड’मध्ये विविध गुणदर्शन
चंदगड ः तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बीएडच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. संस्थेचे अध्यक्ष महादेव वांद्रे अध्यक्षस्थानी होते. संग्रामसिंह कुपेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी शिक्षणाला कलेची जोड देणे गरजेचे आहे. सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व सर्वांनाच आवडते. त्यासाठी प्रयत्न करावा.`` वांद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाटक आदी कलाविष्कार सादर केले. प्राचार्य एम. सी महांतेश, एन. जे. कांबळे, एस. पी. गावडे, सांस्कृतिक विभागप्रमुख ग. गो. प्रधान, यु. डी. कांबळे, एम. एस. घुगरे, एस. के. कांबळे, एस. आर. देशपांडे यांनी परिश्रम घेतले. उपाध्यक्ष मोहन परब, संचालिका मृणालिनी वांद्रे, गोपीनाथ गवस, महादेव गावडे, लक्ष्मी गावडे, विजयकुमार गावडे, ए. पी. पाटील, व्ही. पी. गुरव उपस्थित होते.
----------------------------------
फॅशन डिझायनिंग कार्यशाळा
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात जागर जाणिवांचा विभागामार्फत फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम चालवला जातो. त्या अंतर्गत एक दिवसाची फॅशन डिझायनिंग कार्यशाळा घेण्यात आली. संजना लोहार यांनी मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. आर. ए. कमलाकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एस. बी. दिवेकर यांनी आभार मानले.
---------------------------------------
शिक्षक कॉलनीत अनियमित दाबाने वीज
चंदगड ः येथील शिक्षक कॉलनीमध्ये अनियमित दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या हवामानात प्रचंड उष्णता वाढलेली असताना वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पंखे, एसी, फ्रीजसारखी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. छतावरील पाण्याच्या टाकीत पाणी चढवण्यासाठी अर्धा एचपीची मोटरही चालत नाही, अशी स्थिती आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष होत आहे. दोन दिवसांत सुधारणा न झाल्यास कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शंकर मनवाडकर यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com