
आजरा ः कोळींद्रे कार्यक्रम बातमी
ajr191.txt
ajr191.jpg.....
97132
कोळींद्रे ः येथे मेळाव्यात बोलताना सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील. यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसूल नायब तहसीलदार विकास कोलते व अन्य.
समाजपरिवर्तन स्वतःपासून करा
अविनाश पाटील ; कोळींद्रेत सलोखा योजनेंतर्गत मेळावा
आजरा, ता. १९ ः समाजात परिवर्तन करावयाचे असेल तर स्वतःपासून सुरवात करायला हवी. तरच समाजात परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आजरा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी केले.
कोळींद्रे (ता. आजरा) येथे सलोखा योजनेतंर्गत ग्रामस्थांचा मेळावा झाला. या वेळी श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसूल नायब तहसीलदार विकास कोलते प्रमुख उपस्थित होते. सरपंच रंजना सावंत अध्यक्षस्थानी होत्या.
सुरेश बुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविकात योजनेचा हेतू स्पष्ट केला. ग्रामपंचायत सदस्य विजय कांबळे, भिकाजी गोंधळी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. श्री. पाटील म्हणाले, ‘शेती तोट्याची आहे. पण शेतीमधील चित्र बदलावयाचे असेल तर सेंद्रिय शेती करावी लागेल. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल स्वतः बाजारात विकायला शिकले पाहिजे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सलोखा योजनेतंर्गत साखळी रस्ते, पाणंद रस्ते, पायवाटा व इतर तक्रारी असतील तर तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. तसेच रस्ते, गटारी, घर, परसु याबाबत तक्रारी असतील तर शासनाकडून त्याचा निपटारा केला जाईल. श्री देसाई म्हणाले, ही योजना गावच्या विकासासाठी राबविण्यात येत आहे. याचा फायदा ग्रामस्थांनी घ्यावा. या वेळी काही ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या व निवेदन दिले. उपसरपंच सदाशिव हेब्बाळकर, विष्णु वाके, नरसु शिंदे, शरद उंडगे, ग्रामसेवक विक्रम देसाई, युवराज देसाई, रणजित परीट, राजेंद्र कांबळे, सारिका संकपाळ, विलास राजाराम, कोतवाल दीपक गोंधळी यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब नावलगी यांनी आभार मानले.