सीपीआर मध्ये अर्भक

सीपीआर मध्ये अर्भक

‘सीपीआर’मधील सीसीटीव्हीस
सुरक्षा व्यवस्थेचा ढीसाळपणा उघड

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः सीपीआर आवारात आज सकाळी दोन नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळली तसेच मोकाट कुत्र्यांकडून लचके तोडल्याचे आढळले तसेच यात एक अर्भक स्त्री जातीचे असल्याने स्त्री भ्रुण हत्येचा प्रकार असावा का अशी शंका उपस्थित होत आहे. यातून सीपीआरमधील सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्थेचा ढीसाळपणा उघड झाला आहे.
सीपीआर आवारात सकाळी सुरक्षा रक्षकांना पाणी टाकीच्या बाजूला एक नवजात अर्भक तर काही वेळात शवचिकित्सा कक्षाच्या बाजूलाही दुसरे एक अर्भक बेवारस स्थितीत दिसले. सुरक्षारक्षकांनी माहिती वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षकांना दिली. पोलिसांनाही घटनास्थळी येऊन पंचनामा केला त्यानंतर दोन्ही अर्भक शवचिकित्सेसाठी दाखल केली.
घटनास्थळी सीपीआर आवारात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या वर्षानुवर्षे आहेत. सीपीआरातील रूग्णांचे नातेवाईक उघड्यावर झोपतात, त्यांनाही कुत्र्या टोळ्यांचा उपद्रव सोसावा लागतो. सीपीआरमध्ये अतिक्रमन काढण्यात प्रशासनाला शक्य झालेले नाही. परिणामी खाद्य पदार्थाच्या गाड्यावरील खरकटे तसेच रूग्णांच्या नातेवाईकांनी उघड्यावर जेवण करून टाकलेले खरकटे पदार्थ कुठेही पडलेले असतात. त्याच्या शोधात मोकाट कुत्र्यांचे वास्तव्य येथे नेहमीचे आहे. अशा कुत्र्यांकडून अर्भकाना गंभीर लचके तोडले. एवढे होऊन सुरक्षा रक्षक व अन्य वैद्यकीय यंत्रणेच्या लक्षात बाब आलेली नाही.
सीपीआर आवारात १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यापैकी दोन फाटकांवर, अपघात विभागात प्रत्येक महत्वाच्या वार्डात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, कुंपनांवर सर्वत्र लक्ष ठेवता येईल असे मोजकेच कॅमेरे आहेत. यात पाच कॅमेरे अधून-मधून बंद पडतात. त्यामुळे ज्याभागात कॅमेरे नाहीत अशा अडगळीच्या ठिकाणी हे अर्भक आढळले. घटनेचा धागा सापडण्याइतपत दृष्य सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद कसे झाले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सुरक्षा व्यवस्थाच कमकुवत ठरल्याचे दिसत आहे.

कोट
सीपीआरमध्ये एखादे अर्भकाचा मृत्यू झाल्यास ते अर्भक संबधित नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाते. त्याची रितसर नोंद होते. दहन विधी झाल्याची पोचही संबधित नातेवाईकांकडून पोच घेतली जाते. त्यामुळे सीपीआरमधील अर्भक उघड्यावर पडणे शक्य नाही. तरीही
सीपीआर आवारात बेवारस सापडलेल्या अर्भकांची माहिती तत्काळ पोलिसांना दिली तपास होईल. सीपीआरकडून पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्यात येत आहे. तुर्त अर्भक कोठून कशी आली हे समजू शकलेले नाही.’’
डॉ. गिरीश कांबळे, वैद्यकीय अधिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com