तहसीलदार विकास अहिर यांचा सरपंच परिषदेतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तहसीलदार विकास अहिर यांचा सरपंच परिषदेतर्फे सत्कार
तहसीलदार विकास अहिर यांचा सरपंच परिषदेतर्फे सत्कार

तहसीलदार विकास अहिर यांचा सरपंच परिषदेतर्फे सत्कार

sakal_logo
By

ajr201.jpg
97220
आजरा ः तहसीलदार विकास अहिर यांचा सत्कार करतांना तालुकाध्यक्ष जी. एम. पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य राजू पोतनीस व अन्य मान्यवर.
------------------
तहसीलदार विकास अहिर यांचा सरपंच परिषदेतर्फे सत्कार
आजरा, ता. २१ ः सरपंच परिषदेच्या येथील शाखेतर्फे माण (जि. सातारा) येथे बदली झाल्यानिमित्त तहसीलदार विकास अहिर यांचा सत्कार केला. संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य राजू पोतनीस व संघटनेचे तालुकाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी तहसीलदार अहिर यांचा सत्कार केला.
श्री. पोतनीस म्हणाले, कोरोनात सरपंचाना विश्वासात घेवून तहसीलदार अहिर यांनी केले काम हे अतुलनीय होते. त्यांनी कायदा व व्यवहार याची सांगड घालून काम केले. त्यामुळे शासनाच्या विविध योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवल्या.’ जी. एम. पाटील म्हणाले, ‘तहसीलदार अहिर हे अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी लोकाभिमुख काम केले आहे.’ जिल्हा कार्यकारणी सदस्य संभाजी सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका कार्यकारणी सदस्य संतोष बेलवाडे, समीर पारदे, अॅड. लक्ष्मण गुडुळकर, अमोल बांबरे, वसंत देसाई, आप्पासाहेब देसाई, सी. डी सरदेसाई आदी उपस्थित होते.