महाराष्ट्र १९ वर्षाखालील निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र १९ वर्षाखालील निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा
महाराष्ट्र १९ वर्षाखालील निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा

महाराष्ट्र १९ वर्षाखालील निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

कोल्हापूर जिल्हा एक डाव व ११४ धावांनी विजयी
महाराष्ट्र १९ वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा; करण वाघमोडेचे शतक, रवि चौधरीचे ६ बळी

कोल्हापूर, ता. २१: महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित १९ वर्षाखालील (दोन दिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील सामना सोलापूर येथे कोल्हापूर जिल्हा संघ विरूद्ध रायगड जिल्हा संघ यांच्यात झाला. सामन्यात कोल्हापूर संघाने एक डाव व ११४ धावांनी विजय मिळवला.
रायगड संघाने पहिल्या डावात २६.१ षटकांत सर्वबाद ११४ धावा केल्या. यामध्ये चैतन्य पाटीलने ६८ धावा केल्या. कोल्हापूर संघाकडून पहिल्या डावात साईप्रसाद माने ३, सौरभ कोटलगी २, वरद माळी, यतीराज पाटोळे, सुमित कदम व रवी चौधरी यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. कोल्हापूर संघाने पहिल्या डाव ६१ षटकांत ८ बाद ३३० धावावर घोषित केला. यामध्ये करण वाघमोडे १०४, विवेक पाटील व अभिनंदन गायकवाडने प्रत्येकी ५८ धावा केल्या. रायगडकडून चैतन्य पाटील ३, सुमित म्हैत्रे २, अमेय पाटील, तेजस मोहीते यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.
रायगड संघाने दुस­ऱ्या डावात ४१.१ षटकांत सर्वबाद १०२ धावा केल्या. यामध्ये यश परिचा ४५, अमेय पाटील १९ व साई भिल्लारे १४ धावा केल्या. कोल्हापूर संघाकडून दुस­ऱ्या डावात रवी चौधरी ५, सौरभ कोटलगी २, सुमित कदम व वरद माळी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.