आर.सी.गॅंग टोळी हद्दपार

आर.सी.गॅंग टोळी हद्दपार

फोटो येणार आहे.....
-------------

आरसी गॅंगचे दहा गुन्हेगार हद्दपार
---
जिल्हा पोलिस अधीक्षकांची कारवाई; टोळीवर तिसऱ्यांदा बडगा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः राहुल चव्हाण ऊर्फ आर. सी. गॅंगचा प्रमुख रवी सुरेश शिंदेसह दहा जणांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ही कारवाई केली. गॅंगने राजारामपुरी, जवाहरनगरासह शहर व परिसरात दहशत माजविली आहे. या टोळीविरुद्ध प्राणघातक शस्त्रानिशी कट रचून विरोधी टोळीच्या प्रमुखाच्या खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांमुळे ही कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून पत्रकाद्वारे दिलेली माहिती अशी ः हद्दपार केलेल्यांमध्ये पोलिस रेकॉर्डवरील टोळीप्रमुख रवी सुरेश शिंदे तसेच रवी शिंदे दादाप्रेमी आरसी गॅंगचा प्रकाश कुबेर कांबळे, संदीप मोतीराम गायकवाड, योगेश मानसिंग पाटील, जावेद इब्राहिम सय्यद, सागर सुरेश जाधव, प्रदीप रामचंद्र कदम, अक्षय ऊर्फ आकाश अशोक कदम, अजय ऊर्फ अजित सुनील माने आणि विकी अनिल माटुगे यांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांसह संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन करण्‍याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अधीक्षक बलकवडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांना हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्यातील निरीक्षक अनिल तनपुरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव सादर केला. गडहिंग्लजचे पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी प्रस्तावाची चौकशी केली. चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल व अंतिम सुनावणीअंती निष्पन्न होत असलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

दहशतीमुळेच
टोळीविरुद्ध प्राणघातक शस्त्रानिशी कट रचून विरोधी टोळीप्रमुखाच्या खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर व साधी दुखापत करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्त्रानिशी दरोड्याचा प्रयत्न अशा सार्वजनिक सुव्यवस्थेच्या विरोधातील गुन्ह्यांचा समावेश आहे. टोळीमुळे परिसरात भय व धोका आहे. टोळीच्या दहशतीमुळे अनेक गुन्हे पोलिस ठाण्यात फिर्यादींअभावी दाखल झाले नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई झाली आहे.

सहा महिने, सात प्रस्ताव; ४७ गुन्हेगार हद्दपार
शिवाजीनगर पोलिस ठाणे- प्रफुल्ल जाधवसह सहा जणांना जिल्ह्यातून वर्षभरासाठी
शाहूपुरी- अजय ऊर्फ भोल्या सकटेसह चौघे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी
जुना राजवाडा- संजय आवळेसह १२ जण जिल्ह्यातून वर्षभरासाठी
शाहूपुरी- आयुब जमादारसह पाच जण जिल्ह्यातून वर्षभरासाठी
राधानगरी- बबलू ऊर्फ अनिल पोवारसह तिघे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी
शाहूपुरी- नकुल जाधवसह सात जण जिल्ह्यातून वर्षभरासाठी
राजारामपुरी- रवी शिंदेसह सात जण जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com