बालकलाकार अन्‌ शिवराय

बालकलाकार अन्‌ शिवराय

फोटो : ९७६८०
कोल्हापूर : बिंदू चौकातील संयुक्त रविवार पेठेतील शिवरायांची मुर्ती.
....

संयुक्त राजारामपुरी, रविवार पेठतर्फे विविध कार्यक्रम

कोल्हापूर, ता. २१ : शिवजयंतीच्या पाश्‍‍र्वभूमीवर आज संयुक्त राजारामपुरी परिवार, संयुक्त रविवार पेठ, संयुक्त न्यू शाहुपूरीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
संध्याकाळी सात वाजता राजारामपुरी परिसरातील बाल कलाकारांना संधी देण्याकरीता गोरखनाथ कालेकार दिग्दर्शित ‘स्वराज्याचे शिलेदार’ हे ऐतिहासिक तीन तासांचे नृत्य-नाट्य सादरीकरण केले. राजारामपुरी १३ वी गल्लीतील श्री हनुमान मंदिराच्या बाजूला भव्य स्टेज उभे केले आहे. शनिवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजता जे. जे. स्केटिंग ॲकॅडमीच्या स्केटिंगपटूंमार्फत शिवज्योतीचे आगमन होणार आहे. अध्यक्ष अनुप पाटील, उपाध्यक्ष संग्राम निंबाळकर, सचिव विघ्नेश आरते, आसिफ मुल्लाणी, जयराज निंबाळकर आदी नियोजन करत आहेत.

संयुक्त न्यू शाहुपूरीतर्फे काल (ता. २०) छत्रपती शिवरायांच्या मुर्तीचे उद्‌घाटन झाले. मर्दानी खळ, करवीर फाऊंडेशन महिलांचे झांजपथकांचे सादरीकरण झाले. आज लहान मुलांचे खेळ, संगीत खुर्ची असे कार्यक्रम झाले. अध्यक्ष नितीन जाधव, उपाध्यक्ष करण जाधव नियोजन करत आहेत. संयुक्त रविवार पेठतर्फे काल (ता. २०) लहान मुलांचे लेझीम, लाठीकाठींची प्रात्यक्षिके असे कार्यक्रम घेण्यात आले. आज लहान मुलांच्या वेशभुषा स्पर्धा झाल्या. उद्या (ता. २२) मिरवणूक होईल.अध्यक्ष रवि पाटील, उपाध्यक्ष विनायक चंदुगडे, उत्सव कमिटी अध्यक्ष स्वप्नील ठोंबरे, उपाध्यक्ष सुरज पाटील, सागर लोंढे, खजानिस ओंकार खराटे आदी नियोजन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com