
एसटी पासेस जाब
एसटी प्रशासनाला
युवासेनेने जाब विचारला
कोल्हापूर ः येथील बसस्थानकावर प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून पासधारक विद्यार्थ्यांना उध्दट वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी (ता.२१) युवा सेनेच्या वतीने एसटी प्रशासनाला जाब विचारण्यात आला. संबंधित विद्यार्थ्यांकडे पास असूनही बसमध्ये त्यांना घेतले जात नाही. त्याबाबत विचारणा केली असता उध्दट भाषा वापरली जाते, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. आगारप्रमुख एस.बी.शिंगाडे यांनी येथून पुढे कुठलीही अशी घटना घडली तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले. बसस्थानक परिसरात पासधारक विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असा फलक लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा युवाअधिकारी मंजित माने, वैभव जाधव, सनराज शिंदे, सानिका दामुगडे, काजल कदम, राजश्री मिणचेकर, चैत्यन्य देशपांडे, रोहित वेढे आदी उपस्थित होते.