राजाराम साखर कारखान्याच्या मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम साखर कारखान्याच्या मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू
राजाराम साखर कारखान्याच्या मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू

राजाराम साखर कारखान्याच्या मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू

sakal_logo
By

राजाराम कारखान्याच्या मतदान
केंद्र परिसरात कलम १४४ लागू

कोल्हापूर, ता. २१ ः श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ५८ केंद्रांवर रविवारी (ता. २३) मतदान आणि मंगळवारी (ता. २५) मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीचे मतदान निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडणे आवश्यक असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता मतदानादिवशी रविवारी मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी आदेश जारी केला आहे. या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ प्रमाणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग झाल्यास संबंधित सहकारी संस्था निवडणूक कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.