Mon, Sept 25, 2023

इचलकरंजीत परशुराम जयंती सोहळा उत्साहात
इचलकरंजीत परशुराम जयंती सोहळा उत्साहात
Published on : 22 April 2023, 6:16 am
इचलकरंजीत परशुराम जयंती सोहळा उत्साहात
इचलकरंजी : येथील ब्राह्मण सभा, चित्पावन संघ, श्री. परशुराम सेवा संस्था, बीबीएन, वेद पाठशाळा आदी संस्थाच्या वतीने परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. धाकटा वाडा येथे श्री पूजा व पवमान अभिषेक करण्यात आला. सायंकाळी लायन्स क्लब येथे परशुराम जन्मकाळ सोहळा झाला. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. या वेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश जोशी, उल्हास लेले, त्रिगुण पटवर्धन, शैलेश गोरे आदी मान्यवर प्रमुख
उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कल्पेश दंडगे, आशुतोष नागवेकर, योगेश जेरे, मंदार जोशी, संजय फडणीस, अॅड. सारंग जोशी, चैतन्य चांदेकर, सौरभ मुळे आदींनी परिश्रम घेतले.