शिवजयंती पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंती पत्रके
शिवजयंती पत्रके

शिवजयंती पत्रके

sakal_logo
By

शिवजयंतीदिनी विविध उपक्रम

कोल्हापूर शहर परिसरातील शाळा, महाविद्यालये, मंडळे, विविध संस्थांतर्फे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी झाली. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

00572
साने गुरुजी वसाहत : संयुक्त उपनगर शिवजयंती मिरवणूकीत केरळचे चंडी वाद्य आकर्षण ठरले.

संयुक्त उपनगर समितीतर्फे मिरवणूक
साने गुरुजी वसाहत : येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त नवीन वाशी नाका ते क्रशर चौक मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्यासह विविध विषयांवर चित्ररथ साकारण्यात आले होते. लेझीम, ढोल, ताशे, धनगरी ढोल, हालगी, लेझीम, आधी वाद्यांचा समावेश होता. आमदार ऋतुराज पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार जयश्री जाधव, शारंगधर देशमुख यांची प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीचे उद्‍घाटन झाले. मिरवणुकीमध्ये वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल, सन्मित्र विद्यालय, तेजस मुक्त विद्यालय, वसंतराव जयवंतराव देशमुख मराठी शाळांचे विद्यार्थी सहभागी होते. महिलांनी भगवे फेटे परिधान केले होते, त्याचबरोबर वृंदावन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांनीही चित्र रथ तयार केला होता. मिरवणूक डॉल्बीमुक्त होती. केरळचे चंडी वाद्य समूह खास आकर्षण ठरले.

श्रीदत्ताबाळ हायस्कूल
श्रीदत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचलित श्रीदत्ताबाळ हायस्कूल, श्रीदत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीदत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदीर, श्रीदत्ताबाळ शिशुविहारतर्फे शिवजयंती साजरी झाली. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव निलेश देसाई यांच्या हस्ते झाले. अध्यक्षा पल्लवी निलेश देसाई, विश्‍वस्त वेद देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, मुख्याध्यापिका किर्ती मिठारी, प्रणिता वर्धमाने, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-------------
सम्राट हर्षवर्धन भारतीय सेना
शाहूनगर औद्योगिक परिसर राजारामपुरी याठिकाणी सम्राट हर्षवर्धन भारतीय सेना आणि एनजीओ हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेतर्फे छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती साजरी झाली. जयंतीचे निमित्त कार्यकर्त्यांच्या निवडीची पत्रे दिली. संध्यापक अध्यक्ष रणजित औंधकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत अवघडे, राहुल सोनटक्के, महादेव कोरे, महेश कांजर, भारत मोरे-पाटील, देवेंद्र कांबळे, भिकाजी सोनटक्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शाहू स्मारक चौकात कार्यक्रम
छत्रपती शाहू स्मारक चौक येथे छत्रपती शिवराय जयंती, रमजान ईद, महात्मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्त अॅड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन झाले. याप्रसंगी समाजातील गरजूंना भोजन वाटप केले. धर्मादाय उपायुक्त शिवराज नायकवडी, उदय प्रभावळे, एक्साईज निरीक्षक पी. आर. पाटील, ‘एम.आय.डी.सी.’चे उपअभियंता इराप्पा नाईक, अमोल कुरणे, फिरोज सतारमेकर, अक्षय साळवे, डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, निवास सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा
उजळाईवाडी : शिवजयंतीनिमित्त गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा (ता. करवीर) येथे ठाकरे गटातर्फे प्रतिमा पूजन, मिरवणूक व प्रसाद वाटप झाले. मूर्तीचे पूजन जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, महिला संघटिका स्मिता माने, करवीर तालुकाप्रमुख विनोद खोत, शांताराम पाटील, दिनेश परमार,अश्‍विनी देसाई, राजू सांगावकर, अजित आजरी, दयानंद शिंदे, शंकर खोत, सुशांत देसाई, सुरेश पाटील, अभिजीत पाटील, कणेरीचे सरपंच निशिकांत पाटील उपस्थित होते.

गांधीनगरसह परिसर
गांधीनगर : गांधीनगरसह, गडमुडशिंगी, वसगडे, वळीवडे, चिंचवाड परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गडमुडशिंगी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुदर्शन शिंदे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान, मर्दानी खेळ, दुचाकी रॅली झाली. छत्रपती शिवाजी चौकातील पूर्णाकृती शिवमूर्तीस अभिषेक व पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. वळीवडे येथे ग्रामपंचायतीच्या आवारात असणाऱ्या शिवमूर्तीस शिवराज्याभिषेक केला. सायंकाळी केरळी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

तामगावला बसवेश्वर जयंती
उजळाईवाडी : तामगाव (ता. करवीर) येथे महाराष्ट्र राज्य यशवंत सेनेकडून महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश तांबे बोलताना म्हणाले, ‘कायकवे कैलास’ म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार मांडून, कोणतेही काम कमी किंवा उच्च प्रतीचे नसते, असे तत्त्वज्ञान बसवेश्वर यांनी जगाला दिले. या वेळी डॉ. संदीप हजारे, संजय काळे, तम्मा शिरोले, ललिता पुजारी, राहुल माने, अमित पाटील, आप्पासो पाटील, प्रसाद पाटील, दादासो महाजन, विजय पाटील, धोंडिराम टोंगले, ओंकार चौगले, राहूल पिंपळे, राजू पिंपळे, ऋषी आलासे, सुमित पिंपळे, महेश पिंपळे, आनंद चांदूरे, मारुती चांदूरे, धनंजय पाटील, राहुल निलंगे, सतीश कोंढणपुरे, सचिन पाटील, डॉ. शिवराज पुजारी, ॲड. विश्वजीत गावडे, अमर पुजारी, चंद्रकांत वळकुंजे, गंगाराम हजारे निवास कोळेकर, संदीप वळकुंजे, उत्तम पाचगावे, शहाजी बनकर, सागर पुजारी, शितल पुजारी, दुधाळे उपस्थित होते.