गड-संक्षिप्त

गड-संक्षिप्त

gad231.jpg
97905
भडगाव : कित्तूरकर वाचनालयातील कार्यक्रमात बाळासाहेब मोर्ती यांच्या हस्ते रवींद्र शेंडूरे यांचा सत्कार झाला. शेजारी वाचनालयाचे पदाधिकारी.
----------------------------
भडगावात पुस्तक दिन उत्साहात
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कै. बापूसाहेब कित्तूरकर सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक दिन झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र शेंडूरे यांच्या हस्ते ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अनिकेत कोणकेरी यांच्या हस्ते ग्रंथपूजन झाले. वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब मोर्ती यांच्या हस्ते श्री. शेंडूरे यांचा सत्कार झाला. प्रा. काशिनाथ सावेकर, सिद्धाप्पा बंदी, प्रकाश गोरुले, राजशेखर कित्तूरकर, आझाद अत्तार, गणपती चोथे, वसंत नाईक, बसवराज बंदी, मारुती साळवेकर, शामराव कोरी, विरुपाक्ष हुंदली, मारुती कुरबेट्टी, आप्पासाहेब कापसे, आण्णासाहेब साळवेकर उपस्थित होते.
--------------------------
फोटो क्रमांक : gad232.jpg

97906
गडहिंग्लज : प्रशिक्षण प्रारंभप्रसंगी तुकाराम जाधव यांचा डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते सत्कार झाला. शेजारी गजेंद्र बंदी, डॉ. मंगलकुमार पाटील,
प्रा. अनिल उंदरे उपस्थित होते.

‘घाळी’मध्ये कौशल्य प्रशिक्षणाला प्रारंभ
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात जीटीटी फौंडेशनतर्फे कौशल्य प्रशिक्षणास प्रारंभ झाला. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना मुलाखत, संभाषण, रोजगार, स्वजागृती, देहबोली, आत्मविश्वास, ताणतणाव व्यवस्थापन आदी कौशल्ये शिकविली जातील. ५ मेपर्यंत हे प्रशिक्षण चालेल. संस्थाध्यक्ष डॉ. सतीश घाळी, सहसचिव गजेंद्र बंदी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, फौंडेशनचे तुकाराम जाधव यांची भाषणे झाली. उपप्राचार्य प्रा. अनिल उंदरे, डॉ. नागनाथ मासाळ, डॉ. शशिकांत संघराज, प्रा. सचिन जानवेकर, प्रा. विश्वनाथ पाटील, प्रा. ओंकार खतकल्ले, प्रा. महेश वंडकर उपस्थित होते. समन्वयक डॉ. मनोहर पुजारी यांनी स्वागत केले. डॉ. सरोज बिडकर यांनी आभार मानले.
-----------------------------------

gad233.jpg
97907
बुगडीकट्टी : प्राथमिक शाळेभोवती संरक्षक भिंतीचे रुपाली कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

बुगडीकट्टी शाळेत संयुक्त कार्यक्रम
दुगूनवाडी : बुगडीकट्टी (ता.गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेत संरक्षक भिंतीचे उद्घाटन आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा असा संयुक्त कार्यक्रम झाला. माजी सभापती रुपाली कांबळे यांच्या निधीतून भिंतीचे बांधकाम झाले. कांबळे यांच्या हस्ते संरक्षक भिंतीचे उद्घाटन झाले. सरपंच दयानंद देसाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार झाला. मुख्याध्यापक सुनील यादव यांनी स्वागत केले. कांबळे, श्री. देसाई, उपसरपंच मायाप्पा धनगर, कामान्ना नाईक, शांता शेरवींसह विद्यार्थ्यांची भाषणे झाली. परशराम गायकवाड यांनी सूत्रसंचालन, प्रकाश कुंभार यांनी आभार मानले. यल्लवा हुगाई, बसवराज घस्ती, काकासाहेब देसाई, वसंत हगवणे, प्रदीप मुत्री, भाग्यश्री धनगर, रेणुका येळुरी, राजेंद्र कांबळे, राजकुमार शिंदे, मारुती मगदूम, लीला पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com