शिव बसव जयंती

शिव बसव जयंती

फोटो क्रमांक : gad2310.jpg
97984
गडहिंग्लज : शिवजयंतीनिमित्त संघर्ष ग्रुपतर्फे काढलेल्या मिरवणुकीत कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

फोटो क्रमांक : gad2311.jpg
97985
गडहिंग्लज : वीरशैव समाजसेवा मंडळाच्या मिरवणुकीत महात्मा बसवेश्वर यांचा सजीव देखावा साकारला होता.
-------------------------
मिरवणुकांनी गडहिंग्लज दुमदुमले
शिव-बसव जयंती; पारंपरिक वाद्यांचा दणदणाट
गडहिंग्लज , ता. २३ : शहर परिसरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात झाली. शहरात संघर्ष ग्रुप आणि बसवेश्वर जयंती समितीच्या मिरवणुकांनी परिसर दुमदूमला. पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, युवकासह महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. युवक-युवतींनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकेही झाली.
संघर्ष ग्रुपतर्फे सायंकाळी पाचला म. दुं. श्रेष्ठी विद्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. कलश घेऊन भगव्या साडीत पाचशेहून अधिक महिला सहभागी होत्या. बैलजोड्या, मुलींचे लेझीम पथक, बाहूबली आकर्षण ठरले. संकेश्र्वर मार्ग, मुख्य रस्त्यावरुन येत दसरा चौकात मिरवणूक आल्यानंतर नयनरम्य आतषबाजी झाली. मुलींनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून वाहवा मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्र्वर यांचा पोशाख करून सजविलेल्या ट्रॅ्क्टरमध्ये सजीव देखावा उभारला होता. लक्ष्मी मंदिर मार्गे नेहरु चौक, शिवाजी चौकातून नदीवेस परिसरात मिरवणुकीची सांगता झाली.
बसवेश्र्वर जयंतीनिमित्त चित्रकला, वचन स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. वीरशैव समाज सेवा मंडळ आणि बसवेश्र्वर जयंती समितीतर्फे सायंकाळी पाचच्या सुमारास महादेव मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपारिक ढोल, ताशा आणि बँजो पथक, चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होते. निडसोशी मठाचे निजलिंगश्वर स्वामी, नूल मठाचे गुरुसिध्देश्र्वर स्वामी, स्थानिक बेलबागचे किरण स्वामी यांच्या उपस्थित महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा बसवेश्र्वर, माता अक्कमहादेवी, श्री चन्नबसप्पा यांच्या वेशभूषा केल्या होत्या. पिराजी पेठ येथील महाप्रसादाचा पंधराशे नागरिकांनी लाभ घेतला. दरम्यान, शिवाजी चौक मित्र मंडळ, आजरा मार्गावर छत्रपती ग्रुपतर्फे शिवजयंती झाली.

* शिवसेना शहर शाखा...
येथील शिवसेना गडहिंग्लज शहर शाखेतर्फे शिवजयंती, बसवेश्वर जयंती, परशुराम जयंती आणि ईद झाली. रियाज शमनजी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम झाला. शिवसेना शहर शाखेत शिवराय व बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. घोषणांनी परिसर दणाणला. दुचाकी रॅलीने येऊन शिवाजी चौक येथील शिवप्रतिमेचे तर वीरशैव चौकात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवसेनेचे गडहिंग्लज, आजरा, चंदगडचे समन्वयक रियाज शमनजी, शहर प्रमुख संतोष चिकोडे, उपतालुकाप्रमुख भरत जाधव, शरद दबडे, विभागप्रमुख आनंदा माने, उपशहरप्रमुख संदीप कुराडे, अजित खोत उपस्थित होते.

*हसुरचंपू शिवसेना शाखा...
हसुरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील शिवसेना शाखेतर्फे शिवजयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात झाली. कृपानंद स्वामी (जारकीहोळी) यांच्या हस्ते प्रतिमापूजन केले. शाखाप्रमुख मारुती कमते, शकील मुल्ला, संभाजी यरुडकर, राजू गोटूरे, आनंदा माने, चंद्रशेखर खवणे, किरण पोवार, विजय पोवारसह शिवसैनिक, शिव-बसव दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

* जरळी हायस्कूल...
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथे जरळी हायस्कूलमध्ये महात्मा बसवेश्वर व शिवाजी महाराज यांची जयंती झाली. मुख्याध्यापक विठ्ठल चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. अशोक चितारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी बसवराज बाबांनावर, रावसाहेब कांबळे उपस्थित होते. नूल येथील श्री रामलिंग हायस्कूलमध्ये ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. पी. एस. काकडे, प्रेमला कदम, लता सूर्यवंशी, एम. टी. मांगले, सुरेश मोहिते, रवळू कांबळेंसह विद्यार्थी उपस्थित होते.

आजऱ्यात शिवजयंती मिरवणूक
आजरा ः शहरात संयुक्त पारंपरिक पध्दतीने शिवजयंती झाली. शिवप्रतिमेच्या मिरवणुकीत सर्व तरुण मंडळांचा सहभाग होता. मर्दांनी खेळाची प्रात्यिक्षक लक्षवेधी ठरली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ विद्युतरोषणाई केली होती. शनिवारी (ता. २२) शिवतीर्थावर सकाळी अभिषेक व पूजा झाली. सायंकाळी साडेपाचला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन झाले. व्यंकटराव हायस्कूलपासून शहरात शिवप्रतिमेची मिरवणूक सुरवात झाली. मिरवणुकीत अकरा फुटी सजीव हनुमान प्रात्यक्षिक, एेतिहासिक सजीव देखावा आकर्षणाचा विषय ठरला. लहान मुले, मुली शिवाजी महाराज, मांसाहेब जिजाऊ यांच्यासह मावळ्यांच्या पारंपारिक वेशभूषेत होते. साऊंड व लेझर शोने परिसर उजळला. संभाजी चाैक व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मर्दानी खेळ रंगले. आखाडा वेंगरुळ, महाराष्ट्र व कर्नाटकचे हालगी सम्राट प्रविण पांडुरंग हुल्ले यांचे हलगी वादनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. शिवाजीनगर, संभाजी चाैक, मुख्यबाजारपेठ, सोमवार पेठ, सुतार गल्ली, लिंगायत गल्ली अशी मिरवणुक झाली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या समोर मिरवणुकीची सांगता झाली.

उत्तूरला बसवेश्वर जयंती
उत्तूर ः येथील वीरशैव समाजातर्फे बसवेश्वर जयंतीनिमित्त सभागृहात बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व ग्रामदेवता श्री जोमकाईदेवीच्या प्रतिमांचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष जयकुमार आमनगी होते. यावेळी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी विश्वनाथ करंबळी यांची बिनविरोध निवडीबद्दल सरपंचपदी किरण आमनगी, ग्रामपंचायत सदस्यपदी महेश करंबळी, सनी आमनगी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार झाला. महेश करंबळी यांनी स्वागत केले. सरपंच किरण आमनगी व विश्वनाथ करंबळी यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवलिंग सन्ने, डॉ. प्रकाश तौकरी, प्राचार्य शैलेंद्र आमणगी, गंगाधर हेरेकर, सुहास तौकरी, महांतेश साखरे, गंगाधर सने, विनायक करंबळी, नंदकुमार आमनगी, सुरेश आमनगी, दीपक आमनगी, विलास आमनगी, रवींद्र करंबळी, महालिंग महाजन, प्रकाश आमनगी, राजू आमनगी, राजू देवरू, राजू आमीनभावी , संतोष ढबू, राजू कोणकेरी, हेमलता सने, अर्चना आमनगी, प्रीती देवरू, मालूताई आमनगी, शशिकला सने, रंजना मुंगूरवाडी, शुभांगी आमनगी, शशिकला सने, निवेदिता आमनीभावी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com