अद्यावत स्पोटर्स कॉम्पलेक्स साकारू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अद्यावत स्पोटर्स कॉम्पलेक्स साकारू
अद्यावत स्पोटर्स कॉम्पलेक्स साकारू

अद्यावत स्पोटर्स कॉम्पलेक्स साकारू

sakal_logo
By

gad2314.jpg
98114
गडहिंग्लज : जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलात फुटबॉल मैदान उभारणीला कुदळ मारून हसन मुश्रीफ यांनी प्रारंभ केला. यावेळी उदय जोशी, सुरेश कोळकी, सतीश पाटील, किरण कदम आदी उपस्थित होते.
-------------------

अद्यावत स्पोटर्स कॉम्पलेक्स साकारू
हसन मुश्रीफ; जिल्हा परिषदेच्या संकुलात फुटबॉल मैदान उभारणीला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : गडहिंग्लजला फुटबॉलची मोठी पंरपंरा आहे. पण, हक्काचे मैदान नसल्याने खेळाडूंची कुचंबना होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही उणीव दूर होत आहे. भविष्यात दहा एकर परिसराच्या या क्रीडा संकुलात सर्व खेळांसाठी उपयुक्त अद्यावत स्पोटर्स कॉम्पलेक्स साकारू, अशी ग्वाही माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
येथील वडरगे मार्गावरील जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलात आज सायंकाळी फुटबॉल मैदान उभारणीला प्रारंभ झाला. यावेळी श्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील होते. मुश्रीफ म्हणाले, ''या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून अडीच वर्षात शंभर कोटीहून अधिक निधी खेचून आणला. क्रीडा पंरपंरा लक्षात घेऊन पुण्यातील बालेवाडीच्या धर्तीवर सर्व खेळांसाठी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्यात फुटबॉल मैदानासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संकुलाच्या देखभालीसाठी दुकान गाळ्यांचे नियोजन आहे.’
श्री. पाटील म्हणाले, ''गडहिंग्लज युनायटेडच्या माध्यमातून क्रीडा संघटनाच्या सहकार्याने क्रीडा संकुलासाठी केलेल्या पाठपुराव्याला श्री. मुश्रीफांनी बळ दिल्याने पहिल्या टप्प्याला सुरवात झाली.’ उदय जोशी, किरण कदम, रश्मीराज देसाई यांची भाषणे झाली. अभियंता भोसले यांनी क्रीडा संकुलाची विस्तृत माहिती दिली. सिध्दार्थ बन्ने, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, हारूण सय्यद, प्राचार्य संजय कुंभार, सुनिल चौगुले, गुंड्या पाटील, अर्जून चौगुले आदी उपस्थित होते. अरविंद बारर्देस्कर यांनी स्वागत केले.
----------------
अॅथलेटिक्स ट्रॅक
क्रीडा संकुलात पहिल्या टप्प्यात फुटबॉल मैदानाची उभारणी होईल. त्यानंतर फुटबॉल मैदानाभोवती चारशे मीटर ट्रॅक करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले. त्यासाठी राज्य शासनासह आमदार फंडातून निधीची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले.