पाणीपुरवठा बैठक

पाणीपुरवठा बैठक

98308
कोल्हापूर : पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेच्या व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संयुक्त बैठक घेतली.

पाटबंधारे विभागाशी समन्वय ठेवा
प्रशासक बलकवडे; दोन्ही विभागांची संयुक्त बैठक
कोल्हापूर, ता. २४ : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाशी समन्वय ठेवा, अशी सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली. आयुक्त कार्यालयात पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, शाखा अभियंत्यांची बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
बालिंगा येथील पाणी पातळी कमी होऊन दोन दिवस काही भागात पाणी मिळाले नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याची कायम पातळी राहण्यासाठी पाटबंधारे विभागाशी जलअभियंत्यांनी दैनंदिन समन्वय ठेवावा. पुढील दिड महिना दैनंदिन पाणीपुरवठयाचे योग्य नियोजन करावे. गळती काढण्यासाठी अथवा आपत्कालीन स्थितीत पाणी बंद झाल्यास टँकरद्वारे पुरवठ्यासाठी टँकरचे नियोजन करा. महानगरपालिकेचे टँकर अपुरे पडत असल्यास टँकर भाड्याने घ्या. कळंबा तलावातील गाळ काढण्यासाठी अर्थमुर्व्हस असोसिएशन व जलसंपदा विभागाच्या मदतीने आवश्यक मशिनरी उपलब्ध करून घ्या यासह डिझेल महापालिकेकडून देण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी रोहित बांदिवडेकर, मुख्य लेखाधिकारी सुनील काटे, सहाय्यक अभियंता जयेश जाधव, शाखा अभियंता ए.ए. गुजर, मिलिंद पाटील, मिलिंद जाधव, अभिलाषा दळवी, प्रिया पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com