आजरा ः मोटारसायकल अपघातात युवक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः मोटारसायकल अपघातात युवक ठार
आजरा ः मोटारसायकल अपघातात युवक ठार

आजरा ः मोटारसायकल अपघातात युवक ठार

sakal_logo
By

ajr245.jpg विकास पाटील 98384

आजऱ्यातील अपघातात
देऊळवाडीचा युवक ठार

दुचाकींची समोरासमोर झाली धडक

आजरा, ता. २४ ः आजरा आंबोली रस्त्यावर आजरा पेट्रोलपंपासमोर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये युवक जागीच ठार झाला. विकास महादेव पाटील (वय २१, रा. देऊळवाडी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. रविवारी (ता. २३) रात्री साडेअकरा वाजता अपघात झाला. अपघातामधील जखमी अभिषेक संजय पोतनीस (रा. सातेवाडी, ता. आजरा) यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. जितेंद्र रामचंद्र नवार (रा. आवंडी वसाहत आजरा) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी अभिषेक पोतनीस व मृत विकास पाटील येथे फडके थाळी या हॉटेलमध्ये नोकरीला आहेत. ते बंद करून मित्राच्या दुचाकीवरून (एमएच- 09 बीझेड 4619) संभाजी चौकातील खोलीवर निघाले होते. याच वेळी नवार हा (एमएच -01 बीजे 5997) ही दुचाकी घेऊन समोर आला. दोनही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. विकास दुचाकीवरून खाली फेकल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने ग्रामी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तत्पूर्वी त्याचे निधन झाले. अपघाताला कारणीभूत ठरल्यामुळे नवार याच्यावर आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अंमलदार संतोष घस्ती तपास करीत आहेत.