आपल्याकडे ज्ञान आहे त्याचे प्राॅडक्ट करा-दिपक धडोती

आपल्याकडे ज्ञान आहे त्याचे प्राॅडक्ट करा-दिपक धडोती

98395

ज्ञानाचे प्रॉडक्ट करा : दीपक धडोती
कोल्हापूर इंजिनिअरिंग असो.चा अमृतमहोत्सव
कोल्हापूर, ता. २४ : भारतात भरपूर टॅलेंट व ज्ञान आहे. परंतु त्याचे प्राॅडक्टमध्ये रूपांतर होत नाही. त्यामुळे आपल्याकडील ज्ञानाचे प्राॅडक्ट करा, असे प्रतिपादन दीपक धडोती यांनी केले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘७५ नॅशनल क्रिटीकल प्रोजेक्टस् ऑन अमृत काल ऑफ इंडिया’वर ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुचवलेल्या ७५ विषयांवर विविध प्रोजेक्टवर काम करू लागलो. बेळगावमध्ये शेड घेवून काम सुरू केले आणि नफा मिळू लागला. ड्रोन, सॅटेलाईट, पाणबुडी, रणगाडे, सर्व सर्वो ऍक्टिट्युटेर्स करू लागलो. सर्वो कंट्रोलर्समध्ये बांधकाम साहित्यनिर्मितीसाठी सॉफ्टवेअर तयार करू लागलो. ट्रक , डोझर आणि उपकरणे हायड्रोलिक व्हाँल्व व कंट्रोलर्स करू लागलो. भारतात हे होत आहे मात्र आणखीन खूप काही करू शकतो मात्र त्यासाठी इनोव्हेशन आणि टेक्नाॅलाॅजी पाहिजे. आम्ही केलेली उत्पादने तपासण्यासाठी परदेशी लोक बेळगावला येतात. कमी शिकलेली मंडळीही उद्योजक झाली. बापूसाहेब जाधव त्यापैकीच एक.’ अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डाॅ. डी टी शिर्के म्हणाले, ‘फौंड्रीसारख्या उद्योगाला मोठी जागा लागते. परंतु नवीन टेक्नाॅलाॅजीने कमी जागेतही मोठी उत्पादने घेता आली पाहिजेत. असे तंत्रज्ञान विकसित व्‍हावे.’ अध्यक्ष दिनेश बुधले यांनी, असोसिएशनच्या कार्याची, इतिहासाची आणि अमृतमहोत्सवी उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी केले. यावेळी बाबा कोंडेकर, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, हर्षद दलाल, रणजित शाह, संजय अंगडी, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदीप मांगोरे, दीपक पाटील, एम. वाय. पाटील, ललीत गांधी, जयराज वसा, डाॅ.विलास कार्जिनी, पुराणीक, ए. टी. कुडचे, डाॅ.सुभाष माने, चंद्रकांत चोरगे, किरण चरणे, प्रदीप कापडिया, विज्ञान मुंडे, संजय पेंडसे, मोहन कुशिरे, राजेंद्र डुणंूग, मुबारक शेख, दिलावर शेख, संगीता नलवडे, शांताराम सुर्वे, सुरेंद्र जैन, नलीनी नेने, सुशील हंजे, प्रशांत मोरे व सभासद उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com