आसुर्लेतील मैदानात
अजय निकम विजयी

आसुर्लेतील मैदानात अजय निकम विजयी

98522
आसुर्ले ः येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त पहिल्या क्रमांकाची कुस्ती लावताना सत्यजित पाटील-सरुडकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भगवानराव पाटील, संतोष धुमाळ, संभाजी पाटील आदी.

आसुर्लेतील मैदानात
अजय निकम विजयी
पोर्ले तर्फ ठाणे, ता. २४ ः आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील भैरवनाथ यात्रा व अक्षय तृतीयेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत शाहूपुरी तालमीच्या अजय निकम याने मोतीबाग तालमीच्या ओंकार भाटमारे याच्यावर विजय मिळवला. दोन नंबरच्या कुस्तीत भगतसिंग खोत याने सौरभ माळी याच्यावर एकचाक डावाने विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत अतुल डवरी याने युवराज माने याच्यावर विजय मिळवला. चार, पाच, सहा व सात क्रमांकाच्या कुस्तीत अनुक्रमे मोहन पाटील, आदिनाथ सकटे, यश शिंदे यांनी प्रतिस्पर्धी मल्लावर विजय मिळवला. शुभम निकम व विघ्नेश केसरकर यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
आखाडापूजन माजी सरपंच भगवानराव पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. मैदानात लहान-मोठ्या शंभर कुस्त्या लागल्या. या मैदानासाठी शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, एस. आर. पाटील, निवास ढोले, पांडुरंग पाटील-चिखलीकर, संतोष धुमाळ, हिंदुराव पाटील, पंडित पाटील, सत्यजित पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, पोलिस निरीक्षक ठाणेकर पोलिस सहायक निरीक्षक डोईफोडे आदी उपस्थित होते. शामराव मोळे, गजानन परीट, राजू धनगर, भरत कळंत्रे, महिपती चेचर, नामदेव पाडेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. संभाजी पाटील व प्रदीप पाटील यांनी निवेदक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com