बौद्ध विहारच्या देणगीदारांचा सत्कार

बौद्ध विहारच्या देणगीदारांचा सत्कार

gad254.jpg
98399
शेंद्री : बौद्ध विहारसाठी देणगी दिलेल्यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

बौद्ध विहारच्या देणगीदारांचा सत्कार
गडहिंग्लज : शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथे महाबौद्ध विहार उभारले जाणार आहे. त्यासाठी खडी, वाळू, सिमेंट, स्टील देणगी स्वरुपात दिलेल्या देणगीदारांचा सत्कार केला. पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय लब्यागोळ, अरुण सिद्धनाईक, दयानंद सिद्धनाईक, अर्जुन दुंडगेकर, शिवराज कांबळे, शिवाजी माने, शीतल कांबळे, संजय कांबळे यांनी देणगी दिली. साहित्याची वाहनांची सवाद्य मिरवणूक काढली. एस. आर. कांबळे, परशुराम कांबळे, भीमराव मोहिते, संजय कांबळे, आनंदराव कांबळे, प्रा. जी. पी. कांबळे, एस. बी. बाळेशगोळ, दयानंद कांबळे, अर्जुन दुंडगेकर, एस. पी. थरकार, शिवराज कांबळे, विजय शिरगावकर, एस. आर. कांबळे, प्रा. डी. जी. चिघळीकर, प्रिती कांबळे, रुपाली कांबळे आदी उपस्थित होते. प्रभारी सरपंच प्रतिभा कांबळे यांनी स्वागत केले. ए. के. कांबळे यांनी आभार मानले.
------------
gad253.jpg :
98398
दिपाली पाटील

दिपाली पाटीलला सुवर्ण पदक
गडहिंग्लज : येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलची विद्यार्थिनी दिपाली पाटील हिने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत सुवर्णपदक पटकाविले. दि मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशनतर्फे ही परीक्षा घेतली होती. शास्त्राची चिकित्सकवृत्ती तपासणारा प्रकल्प तिने सादर केला होता. तसेच अगदी मोजक्या शब्दात प्रभावीपणे मनोगत व्यक्त केले होते. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात तिला रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सुवर्ण पदक देऊन गौरवले. विज्ञान शिक्षक जे. एम. भदरगे, मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com