रेडेकर हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडेकर हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबीर
रेडेकर हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबीर

रेडेकर हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबीर

sakal_logo
By

रेडेकर हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबीर
भादवण, ता. २५ ः पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये दोन दिवसांचे उन्हाळी शिबीर झाले.
व्यंकटराव हायस्कूलचे कलाशिक्षक कृष्णा दावणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी चित्रकलेतील विविध बारकावे शिकवले. जलरंग, तैलरंग यासह पोट्रेट याची माहिती दिली. नवकृष्णा व्हॅली उतूरचे इंग्रजी शिक्षक रामकृष्ण मगदूम यांनी इंग्रजी भाषेत बोलणे याबाबत मार्गदर्शन केले. एस. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नेसरीच्या माजी प्राचार्या प्रणिता शिपुरकर यांनी कथाकथनातून विद्यार्थ्यांना छान गोष्टी सांगत मंत्रमुग्ध केले. केदारी रेडेकर संस्था समुहाच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. एस. एम. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. व्ही. बी. देऊसकर यांनी सुत्रसंचालन केले. यु. के. जाधव यांनी आभार मानले.