सांगशीच्या संघाला विजेतेपद

सांगशीच्या संघाला विजेतेपद

98588
निवडे (ता. गगनबावडा) : सांगशी क्रिकेट संघाचे विजयी खेळाडू चषकासह.


सांगशीच्या संघाला विजेतेपद
गगनबावडा प्रीमियर लीग; साखरी संघ उपविजेता
गगनबावडा, ता. २५ : गगनबावडा प्रीमियर लीग आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा निवडे (ता. गगनबावडा) येथील मैदानावर पार पडल्या. तालुक्यातून आठ संघातून १२० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. चुरशीच्या अंतिम सामन्यात सांगशीच्या क्रिकेट संघाने यंदाचे विजेतेपद पटकावले, तर साखरी क्रिकेट संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विजेत्या सांगशी संघास चषक व ५१ हजार, उपविजेत्या साखरी संघास चषक व ३५०००, उत्तेजनार्थ संघास प्रत्येकी दहा हजार बक्षीस देण्यात आले. मालिकावीर महेंद्र पाटील (सांगशी), सर्वोत्कृष्ट फलंदाज आनंद आडुळकर (सांगशी), सर्वोत्कृष्ट गोलंदाज यासर नाकाडे (साखरी) यांनाही सन्मानित करण्यात आले. गगनबावडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभय कोटकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. स्पर्धेचे आयोजन इंद्रजीत पाटील, क्रांतीसिंह सावंत, आर. आर. पाटील, अमोल पाटील, अजित कदम यांनी केले. या वेळी रमेश पाटील, शरद पवार, मनोज पडवळ, लहू पाटील, गणपती पाटील, दीपक पाटील, दगडू भोसले, संदीप पाटील, अमर कांबळे, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com