शिवाजी मंडळ अंतिम फेरीत

शिवाजी मंडळ अंतिम फेरीत

लोगो - ‘इंगवले सर’ फुटबॉल स्पर्धा


शिवाजी मंडळ अंतिम फेरीत 
आक्रमक खेळीने रोमांच; खंडोबा तालीम संघावर २ - ० ने मात 
कोल्हापूर, ता. २५ : उत्तरार्धात झालेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर दोन गोल नोंदवत श्री शिवाजी तरुण मंडळ संघाने खंडोबा तालीम मंडळ संघावर २ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवत इंगवले सर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. झुंजार क्लब आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे.
पहिला उपांत्य सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघाकडून झालेला आक्रमक खेळ, खेळाडूंमधील ईर्षा यामुळे मैदानावर रोमांच निर्माण झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघाकडून गोलसाठी नियोजनबद्ध चढाया झाल्या. मात्र दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंना एकमेकांच्या बचाव फळी भेदण्यात अपयश आले. पूर्वार्धात खंडोबा संघाकडून दिग्विजय असणेकर, संकेत मेढे, कुणाल दळवी, चीजोबा, प्रभू पोवार यांच्या चढाया फोल ठरल्या. उत्तरार्धात शिवाजी मंडळकडून झालेल्या आक्रमक चढायांमुळे संधी निर्माण झाली. यात सामन्याच्या ५३ व्या मिनिटाला सिद्धेश साळोखे याने विक्रम शिंदे हेडद्वारे चेंडू गोलजाळीच्या दिशेने वळवला हा चेंडू खंडोबा संघाच्या ओमकार लायकरला लागून गोल जाळीत विसावला. यामुळे मंडळ संघाला १-० अशी आघाडी मिळाली. या गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाकडून झालेले प्रयत्न फोल ठरले. दरम्यान, सामन्याच्या ६९ व्या मिनिटाला शिवाजी मंडळच्या करण चव्हाण-बंद्रे याने दिलेल्या पासवर सुयश हांडे याने गोल नोंदवत संघाला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. दरम्यान, खंडोबा संघाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर चिजोबाने गोल जाळीवरुन चेंडू फटकावल्याने नामी संधी वाया गेली. अखेरपर्यंत हाच गोल फरक कायम राहत मंडळ संघाने अंतिम फेरी गाठली.
------------------
सामन्यानंतर तणाव
फुटबॉल सामन्यानंतर साठमारीच्या चौकामध्ये समर्थकांचे दोन गट समोरासमोर आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. सामन्यानंतर काही वेळाने झालेल्या या घटनेमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सामनावीर 
विक्रम शिंदे - शिवाजी मंडळ 

लढवय्या 
प्रभू पोवार - खंडोबा मंडळ 

आजचा सामना
संध्याकाळी ४ पीटीएम - अ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com