कुस्ती उद् घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्ती उद् घाटन
कुस्ती उद् घाटन

कुस्ती उद् घाटन

sakal_logo
By

98608

ऑलिंपिक स्पर्धेत पदकाचे ध्येय बाळगा

दीपाली सय्यद ः महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर, ता. २५ : महिला पैलवानांनी ऑलिंपिक स्पर्धेत पदक पटकाविण्याचे ध्येय बाळगावे, असे आवाहन अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांनी आज येथे केले. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद् घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, हनुमान यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. त्यानंतर हवेत फुगे सोडून स्पर्धेस सुरवात झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. राजर्षी शाहू खासबाग मैदानात स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सौ. भोसले-सय्यद म्हणाल्या, ‘महिला महाराष्ट्र केसरीच्या आयोजनासाठी चार वर्षे प्रयत्न करत होते. त्यासाठी राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना भेटले होते. आज ही स्पर्धा होत असून, त्यातून महिलांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यांनीही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिकमध्ये पदक मिळवायला हवे. त्यासाठी समाज घटकांनी त्यांना बळ देणे आवश्‍यक आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘शाहू खासबाग मैदानात स्पर्धा घेण्याचा मानस होता. तो आज पूर्ण झाला आहे. त्यासाठी मला अनेकांनी मदत केली आहे.’
यावेळी हिंदकेसरी योगेश दोडके, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रंगराव हरणे, आपचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, शिंदे गटाच्या शिवसेनेचे सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, पैलवान संग्राम पाटील, संदीप पाटील, वसंत पाटील, अमरजा पाटील, रवींद्र पाटील उपस्थित होते.
---
खासबागेत मॅटचे मैदान
खासबागेत लढतींसाठी मॅटचे मैदान उभारले आहे. कोल्हापूर, मुंबई, वाशिम, जळगाव, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्याचे फलक घेऊन मुली आल्या. आकर्षक रोषणाईत त्यांचे स्वागत झाले.