
छत्रपती राजाराम चषक टी २० क्रिकेट स्पर्धा
लोगो - छत्रपती राजाराम चषक टी २० क्रिकेट स्पर्धा
कागल, सहारा संघाचा विजय
कोल्हापूर, ता. २५ : छत्रपती राजाराम चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये कागल तालुका क्रिकेट विरुद्ध शाहूपुरी जिमखाना ‘ब’ यांच्यात झाला. कागल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जिमखाना ‘ब’ संघाने निर्धारित २० षटकात १० बाद ९९ धावा केल्या. त्यामध्ये शिवम वशिष्ठ याने ३३ चेंडूत ३२ धावा केल्या. कागल संघाकडून गोलंदाजी करताना क्षितिज पाटील ३ बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना कागल संघाने १०.४ षटकात ४ बाद १०१ धावा केल्या. यामध्ये रणजित निकम २४ चेंडूत ५० धावा केल्या. जिमखाना ब कडून श्रेयस देसाई ३ बळी घेतले. सामनावीर रणजित निकम ठरला.
आण्णा मोगणे सहारा स्पोर्ट्स विरुद्ध सिद्धेश्वर स्पोर्ट्स यांच्यात सामना झाला. सहारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सहारा संघाने १९ षटकांत ५ बाद १६६ धावा केल्या. सूरज कोंढाळकर याने ४८ चेंडूत ७२ धावा केल्या. सिद्धश्वर संघाकडून गोलंदाजी करताना तुषार पाटील याने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाने १७.३ षटकात १० बाद ७९ धावा केल्या. यामध्ये मुकुंद गोनुगडे याने २० चेंडूत २३ धावा केल्या. सहारा कडून श्रेयस चव्हाण याने ३ बळी घेतले. सामनावीर सूरज कोंढाळकर ठरला.