कारागहाचे झाले ऑडिट

कारागहाचे झाले ऑडिट

सुरक्षेसाठी मोबाईल जामरचा पर्याय
कळंबा कारागृह ःपोलिसांच्या ऑडीटमध्ये पर्याय पालन करणे गरजेचे

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः कळंबा मध्यवर्ती करागृहात कायमस्‍वरुपी जामर बसविण्याच्या पर्यायाची अंमलबजावणी झाल्यास कारागृहात चोरीछुपे येणाऱ्या मोबाईल हॅण्डसेटला काहीच अर्थ राहणार नाही. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेणे आवश्‍यक आहे. कारागृहात आठवड्यात चार वेळा मोबाइल हॅण्डसेट मिळाले आहेत. त्यामुळे कारागृहाच्या ऑडिटमधील सूचनांचे पालन झाल्यास सध्या रामभरोसे असलेली सुरक्षा नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
कळंबा कारागृहात गांजा आणि मोबाईल हॅण्डसेट पुरवठा करणाऱ्यांचा बंदोबस्त करणे कारागृह प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात आहे. क्षमतेपेक्षाअधिक कैदी, आवश्‍यकतेपेक्षा कमी कर्मचारी, प्रभारीवर चालविले जात असेलेले कारागृह अधीक्षकपद यांचा कारागृहाच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. यापूर्वी कळंबा कारागृहात गांजा पार्टी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नुकताच गांजासह मोबाईल हॅण्डसेट मिळाले आहेत. त्यामध्येही सीम कार्ड नसते. हॅण्डसेट आतमध्ये गेल्यानंतर सीम कार्ड पोचविण्याची काही वेगळी यंत्रणा कार्यान्वीत आहे की पूर्वीच सीम कार्ड कारागृहात नेले आहे याचाही तपास होणे आवश्‍यक आहे.
अलीकडेच पोलिसांच्या यंत्रणेकडून कारागृह सुरक्षेचे ऑडीट झाले आहे. त्यामध्ये त्यांनी कारागृहात मोबाईल जामर बसविण्याचे सुचित केले आहे. कारागृहात प्रवेश केल्यानंतर मोबाईल हॅण्डसेट बंद करून जमा करावे लागतात. त्यामुळे तेथील कामकाज लॅण्डलाईन फोनवरूनच होते. आशा वेळी मोबाईल जामर बसविल्यास फार मोठी आपत्ती येईल असे काही नाही. त्यामुळे हा पर्याय कारागृह प्रशासनाने स्वीकारणे आवश्‍यक आहे.
-----------
चौकट
उपाययोजना अशा
-सीसीटीव्ही दर्जेदार असावेत, संख्या वाढवावी
-कैद्यांना नातेवाईक भेटतात तेथे सीसीटीव्ही असावेत
-चौकटीच्या मेटल डिटेक्टरबरोबरच हॅण्ड डिटेक्टर असावेत
-संपूर्ण कंपाऊंडवर जाळीचे किमान दहा फुट उंच कंपाऊड वाढवावे
-मनोरा टॉवरवर दिवस-रात्र सुरक्षा रक्षक आसावा

चौकच
पथक कोल्हापुरात?
गेल्या काही दिवसांत गांजा, मोबाईल हॅण्डसेट मिळाल्यामुळे कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक कळंबा मध्यवर्ती कारागृहात आल्याची माहिती पुढे आली आहे. कारागृहातील प्रत्येक काना-कोपऱ्याची झडती घेतली जात असल्याचे समजते. मात्र याबाबत नेमकी स्थिती काय आहे, याची अधीकृत सविस्तर माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com