
चंदगड
98640
चंदगड ः स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व चंदगड पोलिसांनी तालुक्यातील ८ गावठी दारू अड्डे आज उध्दवस्त करण्यात आले
चंदगड तालुक्यातील
८ गावठी दारू अड्डे उध्दवस्त
कोल्हापूर, ता. २५ : चंदगडमधील ८ गावठी दारू अड्डे आज उध्दवस्त करण्यात आले. या प्रकरणी राजाराम परशराम वाघमोडे (वय ६५ रा. माणगाव ता.चंदगड) याच्यासह चौघांवर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कारवाईत तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली.
चंदगड तालुक्यातील यर्तनहट्टी, चनेहट्टी व डुक्करवाडी या गावातील नदी किनाऱ्यावर सुरू असलेले आठ दारु अडड्डे पोलिसांनी उध्वस्त केले. चार ठिकाणची हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ३६५ लिटर रसायन नष्ट केले आहे.
या कारवाईत प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक शेष मोरे, चंदगडचे निरीक्षक संतोष घोळवे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.