Wed, Sept 27, 2023

गड-अॅडव्होकेटस असोसिएशन
गड-अॅडव्होकेटस असोसिएशन
Published on : 26 April 2023, 1:03 am
फोटो क्रमांक : gad२६५.jpg :
अॅड. सुनील तेली, अॅड. डी. बी. नागोंडा, अॅड. जी. पी. पाटील
-----------------------
98672
अॅड. सुनील तेली अध्यक्षपदी
गडहिंग्लज ः येथील गडहिंग्लज तालुका अॅडव्होकेट बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा झाली. यात २०२३-२४ साठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अॅड. सुनील तेली यांची अध्यक्षपदी निवड झाली. डी. बी. नागोंडा यांच्यावर उपाध्यक्षपदाची तर अॅड. जी. पी. पाटील यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अॅड. आकाश पाटील यांची लोकल ऑडिटरपदी, अॅड. बाळासाहेब देसाई यांची ग्रंथपालपदी, अॅड. ए. बी. शिंत्रे यांची सदस्यपदी तर अॅड. माया पाटील यांची महिला सदस्या म्हणून निवड केली आहे. निवडीनंतर नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. आर. आय. पालकर यांचे भाषण झाले. अॅड. नुसरत पाटील यांनी आभार मानले.