शिक्षण मंडळ कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण मंडळ कार्यशाळा
शिक्षण मंडळ कार्यशाळा

शिक्षण मंडळ कार्यशाळा

sakal_logo
By

शिक्षकांनी हस्ताक्षर सुंदर बनवावे
प्रशासनाधिकारी शंकर यादव; प्राथमिक शिक्षण समितीची कार्यशाळा
कोल्हापूर, ता. २६ : ‘‘ज्या शिक्षकांचे हस्ताक्षर सुंदर आहे, त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर बनते. यासाठी सर्वच शिक्षकांनी हस्ताक्षर सुंदर बनवावे,’’ असे आवाहन प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी केले.
महापालिकेच्या वि. स. खांडेकर विद्यालयात प्राथमिक शिक्षण समितीने प्राथमिक शिक्षकांसाठी चारदिवसीय हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये देवनागरी लिपीचे अवयव, अक्षर लेखनाचे नियम त्याचबरोबर अक्षर लेखनाचा सराव आणि सुंदर हस्ताक्षराचे बारकावे शिक्षकांना शिकवण्यात आले. ज्ञानदीप विद्यालयाचे सहायक शिक्षक सुहास सुतार, बोंद्रेनगर विद्यालयाचे सहायक शिक्षक मनोहर बुरुड यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळा आयोजित करण्यासाठी महापालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे विशेष सहकार्य लाभले. उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शानातून व प्रशासनाधिकारी शंकर यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांच्या संकल्पनेतून कार्यशाळा साकारण्यात आली. सुधाकर सावंत, द्रोणाचार्य पाटील, विजय माळी, उषा सरदेसाई यांचे विशेष सहकार्य लाभले.