Sun, October 1, 2023

सिरसंगीमध्ये विकासकामांचा प्रारंभ
सिरसंगीमध्ये विकासकामांचा प्रारंभ
Published on : 27 April 2023, 12:19 pm
सिरसंगीमध्ये विकासकामांचा प्रारंभ
आजरा ः विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सिरसंगी (ता. आजरा) येथे ६७ लाख ५० हजारांच्या रस्त्याच्या दुतर्फा आरसीसी गटर्स बांधकामाचा प्रारंभ झाला. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्याहस्ते प्रारंभ झाला. आजरा तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष जयवंत सुतार यांचे प्रयत्नातून निधी मिळाला. श्री. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयवंत सुतार, भाजप माजी तालुकाध्यक्ष अरूण देसाई, शंकर आंबेवाडकर, चंद्रकांत कांबळे, अंकुश गवस, गणेश फाटक आदी उपस्थित होते. सरपंच संदीप चौगले यांनी आभार मानले.