पाणीपुरवठा 
झाला सुरळीत

पाणीपुरवठा झाला सुरळीत

पाणीपुरवठा
झाला सुरळीत
कोल्हापूर, ता. २६ ः चार दिवसांनंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. उपसा व्यवस्थित सुरू होण्याबरोबरच कळंबा तलावातीलही पाणी मिळाल्याने फारच कमी भागात कमी दाबाने पाणी आले. नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने शनिवारपासून शहरातील विविध भागांत पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली. रविवार व सोमवारी त्याचे प्रमाण जास्त होते. याच दरम्यान नदीत पाणी सोडले असले तरी उपसा पूर्ण क्षमतेने नव्हता. तसेच गळती दुरुस्ती केली जात असल्याने कळंबा तलावातूनही मिळणारे पाणी बंद झाले होते. मंगळवारपासून पाणी उपसा व्यवस्थित होऊन गळतीही दुरुस्त झाली. त्यामुळे बुधवारी बहुतांश भागात व्यवस्थित पाणी मिळाले. काही भागांतच कमी दाबाने पाणी आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com