विद्युत कर्मचारी संघटना अधिवेशन

विद्युत कर्मचारी संघटना अधिवेशन

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी
संघटनेचे शनिवारपासून अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे बावीसावे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन शनिवार (ता.२९) पासून येथील सुवर्णभूमी लॉनवर होणार आहे. दोन दिवसांच्या या राज्यव्यापी अधिवेशनात देशाच्या कामगार चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी चर्चा होणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य आणि केंद्रीय उपाध्यक्ष आर.एस.कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी (ता.२९) सकाळी अकरा वाजता ‘महापारेषण''चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. ‘महावितरण''चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ‘महानिर्मिती‘चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस.पाटील, राष्ट्रीय महासचिव ए. व्ही. किरण आणि समन्वयक डॉ. के. पी .स्वामीनाथन यांची प्रमुख उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. संजय घोडके असतील. राज्यभरातून चार हजारहून अधिक कर्मचारी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला प्रकाश ठोमके, इंद्रजित कांबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com