महाडिक शुभेच्छा

महाडिक शुभेच्छा

98818

महाडिकांचे अभिनंदन करण्यासाठी रिघ
‘राजाराम’चा विजय; कारखान्यावर स्वीकारलेल्या शुभेच्छा

कोल्हापूर, ता. २६ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आज माजी आमदार महादेवराव महाडिक व अमल महाडिक यांचे अभिनंदन करण्यासाठी झुंबड उडाली होती. कसबा बावडा येथील कारखाना कार्यस्थळावर या दोघांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
‘राजाराम’ची मतमोजणी काल झाली, त्यात महाडिक यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने संचालक पदाच्या सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. या निकालानंतर कालच कारखान्यावर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला होता. आज कारखाना कार्यक्षेत्राबरोबरच जिल्ह्यातील महाडिक प्रेमींनी महाडिक पिता पुत्रांचे अभिनंदन करण्यासाठी कारखान्यावर गर्दी केली होती.
सकाळी आठ वाजता महाडिक कारखान्यावर आले. त्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ग्रामीण भागातून वाहने भरून कार्यकर्ते कारखान्यावर आले होते. यात आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. सायंकाळीही महाडिक यांचे अभिनंदन करण्यासाठी कारखान्यावर गर्दी होती. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदीता माने आदिंनी फोनवरून त्यांचे अभिनंदन केले.

चौकट
आमदार सतेज पाटील अजिंक्यतारावर
‘राजाराम’मधील पराभवानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनाही भेटण्यासाठी त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्ते, नेत्यांनी गर्दी केली होती. कारखाना कार्यक्षेत्रातील गावांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावांत कसे मतदान झाले, विरोधकांना कशी मते पडली याची माहिती दिली. दुपारी बारा वाजेपर्यंत पाटील अजिंक्यतारा या त्यांच्या कार्यालयावर थांबून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com