Wed, October 4, 2023

अध्यक्षपदी श्रीकांत पाटील
अध्यक्षपदी श्रीकांत पाटील
Published on : 27 April 2023, 12:54 pm
98816
अध्यक्षपदी श्रीकांत पाटील
इचलकरंजी ः येथील नगरपरिषद सेवकांची स्वाभिमानी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. नूतन संचालकांच्या बैठकीत अध्यक्षपदी श्रीकांत पाटील व उपाध्यक्षपदी प्रिती मोकाशी यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी आर. जी. कुलकर्णी होते. संस्थापक संभाजी काटकर यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. संचालक रविंद्र निंबाळकर, मंगेश दुरुगकर, संजय कोळी, रामचंद्र कोळेकर, राजेश शेलार, संदिप जोशी, मकरंद लोहार आदी उपस्थित होते.