कुस्ती स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्ती स्पर्धा
कुस्ती स्पर्धा

कुस्ती स्पर्धा

sakal_logo
By

९८७९२
कोल्हापूर : येथे सुरू असलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत एक कुस्तीपटू प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करताना.

लोगो- महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा

आज रंगणार अंतिम सामना

कोल्हापूरसह पुणे, नगर, रायगड, बुलढाणा, धुळे, ठाणेचे वर्चस्व

कोल्हापूर, ता. २६ : महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी विविध वजनी गटांमध्ये कुस्त्या रंगल्या. स्पर्धेत कोल्हापूरसह पुणे, नगर, रायगड, बुलढाणा, धुळे, ठाणे येथील कुस्तीपटूंनी वर्चस्व राखले. गुरुवारी संध्याकाळी महिला महाराष्ट्र केसरी या किताबासाठी अंतिम स्पर्धा रंगणार असून, संध्याकाळी ५ नंतर राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ होणार आहे. दरम्यान, स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला देण्यात येणाऱ्या मानाच्या गदेचे अनावरण आज (ता. २६) मैदानावर करण्यात आले.
विविध वजनी गटांमध्ये झालेल्या कुस्त्यांमधील विजेते
५० किलो वजनी गट ः प्रथम- श्रुती येवले (पुणे) वि.वि. जयंती पाटील (कल्याण), द्वितीय- नाली वर्मा (ठाणे) वि.वि. शिवकन्या भडांगे (बुलढाणा), तृतीय- कशिश बालचोरे (पुणे) वि.वि. स्नेहा मडके (मुंबई).
५५ किलो ः प्रथम- ऊर्जिता नटले (वाशीम) वि.वि. साक्षी शिंदे (धुळे), द्वितीय- ऐश्वर्या सनस (ठाणे) वि.वि. अलिशा कांबळे (कोल्हापूर), तृतीय- धनश्री फंड (अहमदनगर) वि.वि. शिवानी हिंगणे (पिंपरी).
५९ किलो ः प्रथम- आसावरी खोपडे (पुणे) वि.वि. गायत्री माने (भंडारा).
६२ किलो ः प्रथम- मिसबा जमील (कोल्हापूर) वि.वि. मयुरी राठोड (मुंबई), द्वितीय- कार्तिकी पवार (पुणे शहर) वि.वि. सोनिया सरक (सोलापूर), तृतीय- संजना डिसले (सांगली) वि.वि. सुचिता मतकर (अहमद नगर), चतुर्थ- सिद्धी कणसे (सातारा) वि.वि. स्नेहल पुजारी (कोल्हापूर).
६८ किलो ः प्रथम- सई शिंदे (पुणे) वि.वि. प्रतीक्षा बेडगे (कोल्हापूर), द्वितीय- श्रावणी शेळके (कोल्हापूर) वि.वि. आकांशा चौधरी (नागपूर),
खुला गट ः प्रथम- श्रावणी भालेराव (पुणे) वि.वि. अंकिता फराळे (कोल्हापूर), द्वितीय- भाग्यश्री फंड (अहमदनगर) वि.वि. गौरी थोळे (अमरावती), तृतीय- वैष्णवी कुशाप्पा (कोल्हापूर) वि.वि. पल्लवी जाधव (कोल्हापूर), चतुर्थ- दिव्या शिंदे (रायगड) वि.वि. धरणी येलने, (चंद्रपूर), पाचवा- अमृता पुजारी (कोल्हापूर) वि.वि. मोनिका चव्हाण (बुलढाणा)