पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

चोरट्याने पळविले वॉशिंग मशिन
कोल्हापूर ः घराच्या मागील बाजूस ठेवलेले वॉशिंग मशिन चोरट्याने पळविले. शिंगणापूर (ता. करवीर) येथील लक्ष्मी कॉलनीमध्ये ५ ते २५ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याची फिर्याद प्रकाश शंकरराव मगदूम यांनी काल करवीर पोलिस ठाण्यात दिली. सुमारे पंधरा हजार रुपयांचे वॉंशिंग मशिन चोरीस गेल्याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
-
मोटारीची काच फोडून पळविली पर्स
कोल्हापूर ः उमा टॉकीज चौकातील ओढ्यावरील गणपती मंदिर परिसरात मोटारीची काच फोडून चोरट्याने पर्स पळविली. पर्समधील उंची किमतीचा सुमारे ६१ हजार ५०० रुपयांचा मोबाईल हॅण्डसेट पळविला. याची फिर्याद नागाळा पार्क येथील सुजाता निर्मल लोहिया यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोहिया या मंगळवारी सायंकाळी सव्वा आठला ओढ्यावरील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोटारीतून आल्या होत्या. त्यावेळी त्यांची पर्स चालकसीटच्या बाजूला खाली ठेवली होती. चोरट्याने चालक सीटच्या बाजूची काच फोडून सव्वाआठ ते साडेआठ दरम्यान पर्स पळविली.
-
४२ हजारांचा ऐवज पळविला
कोल्हापूर ः लाईन बाजार येथील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्या चांदीने दागिणे आणि रोकड असा सुमारे ४२ हजार २०० रुपयांचा ऐवज पळविला. २३ ते २५ एप्रिल दरम्यान ही चोरी झली. याची फिर्याद वसंत तुकाराम डावरे यांनी काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादी घरी नसल्यामुळे दरवाजा कुलूपबंद होता. त्या काळात चोरट्याने कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख दहा हजार रुपये पळविले. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com