गडहिंग्लजला बाळूमामा मंदिरात आज पालखी मिरवणूक, भाकणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला बाळूमामा मंदिरात आज पालखी मिरवणूक, भाकणूक
गडहिंग्लजला बाळूमामा मंदिरात आज पालखी मिरवणूक, भाकणूक

गडहिंग्लजला बाळूमामा मंदिरात आज पालखी मिरवणूक, भाकणूक

sakal_logo
By

गडहिंग्लजला बाळूमामा मंदिरात
आज पालखी मिरवणूक, भाकणूक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : येथील श्री संत बाळूमामा हालसिद्धनाथ मंदिरात प्रवचन सेवा सुरु आहे. उद्या (ता. २८) पालखी पुजन, पालखी मिरवणूक व नगरप्रदक्षिणा होणार आहे. सायंकाळी धनगरी ओव्यांचा व भाकणुकीचा कार्यक्रम होईल. शनिवारी (ता.२९) सकाळी नऊनंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
जगद्‍गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी, श्री गुरुसिध्देश्वर महास्वामी, भगवानगिरी महाराज, डॉ. आनंद गोसावी, किसन महाराज यांच्याहस्ते संत बाळूमामा मंदिरात पालखी पूजन होईल. त्यानंतर २११ धनगरी ढोलांच्या निनादात श्री संत बाळूमामाची पालखी मिरवणूक व नगरप्रदक्षिणा होणार आहे. सायंकाळी साडेसहाला बळवंत लोंढे यांच्या धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होईल. रात्री भगवान डोळे महाराज यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी सकाळी नऊनंतर महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे.
दरम्यान, मंदिरात दररोज प्रवचन सेवा सुरू आहे. प्रवचन केसरी मल्लिकार्जुन महाराज यांचे सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत प्रवचन आहे. विक्रम सूर्यकांत जगताप महाराज वासुंदेकर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. जगताप महाराजांनी पहाडी आवाजात मामांच्या जीवनावरील अनेक प्रसंग भक्तांसमोर उभे केले. उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, चंद्रकांत सावंत, जयसिंग पवार, राजू पोवळे, बसवराज कोटे, बाबूराव खोत, प्रकाश धबाले, आप्पासाहेब बस्ताडे, बाळासाहेब सुतार आदी उपस्थित होते. मंदिर कमिटीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी स्वागत केले. दिनकर खवरे यांनी आभार मानले.