एनसीसी कॅडेटना सदिच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनसीसी कॅडेटना सदिच्छा
एनसीसी कॅडेटना सदिच्छा

एनसीसी कॅडेटना सदिच्छा

sakal_logo
By

ich272.jpg
98937
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात तृतीय वर्षातील एनसीसी कॅडेटच्या सदिच्छा समारंभात पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी मार्गदर्शन केले.
एनसीसी कॅडेटना सदिच्छा
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात तृतीय वर्षातील एनसीसी कॅडेटचा सदिच्छा समारंभ झाला. एनसीसीमध्ये शिस्त व संवेदनशीलता प्रत्येकाला जीवनात महत्त्वाची ठरते, असे मत पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले. यशस्वी कॅडेटचा सन्मान श्री. हाके यांच्या हस्ते केला. विविध एनसीसी कॅडेटनी मनोगत व्यक्त केले. ५६ महाराष्ट्र बटालियन कोल्हापूर, प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डी. सी. कांबळे होते. मेजर मोहन वीरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आदिती चिकोर्डे यांनी सूत्रसंचालन केले. आनंद गुलगुंजे यांनी आभार मानले.
---------
ich273.jpg
98938
इचलकरंजी : शिवाजी विद्यापीठ वक्तृत्व स्पर्धेत साक्षी बावडेकरने द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार केला.
साक्षी बावडेकरचे यश
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी बावडेकरने शिवाजी विद्यापीठाच्या वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवले. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फ फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाअंतर्गत स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत तिने फुले, शाहू, आंबेडकर आणि स्त्री-पुरुष समानता या विषयावर विचार मांडले. यशाबद्दल प्राचार्य डॉ. विजय माने यांच्या हस्ते तिचा सत्कार केला. उपप्राचार्य डॉ. एन. एम. मुजावर आदी उपस्थित होते.
-------
ich274.jpg
98939
इचलकरंजी : पोलिस दलातील परीक्षेतील यशाबद्दल माजी विद्यार्थ्यांचा नाईट कॉलेजच्या वतीने सत्कार केला.
नाईट कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी : नाईट कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा पोलिस दलातील परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सत्कार केला. रणजित गोंदूकुप्पे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले. सोहेल मुल्ला याची पुणे पोलिस दलात नियुक्ती झाली. या दोघांचा सत्कार प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांच्या हस्ते केला. डॉ. विरुपाक्ष खानाज, स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. माधव मुंडकर, डॉ. शिवाजीराव रणदिवे, डॉ. रवीकिरण कोरे, प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. सौरभ पाटणकर आदी उपस्थित होते.
-------
नृसिंह जयंती उत्सवाचे आयोजन
इचलकरंजी : येथील श्री लक्ष्मी नृसिंह उपासक मंडळातर्फे नरसोबा कट्टा गावभाग येथे नृसिंह जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. सात दिवस होणाऱ्या कार्यक्रमात सामुदायिक वाचन, श्री ज्ञानेश्‍वरी नित्यपाठ होणार आहे. तसेच ३० एप्रिल ते ६ मेदरम्यान विविध विषयांवरील विचार व्यक्त केले जाणार आहेत. राजेंद्र आलोणे यांचे धर्म आणि संस्कृती, मोहन पुजारी यांचे बदलती जीवन शैली, सुदर्शना पाटील यांचे मानव सेवा हीच माधव सेवा, रेवती हणमसागर यांचे प्रभू रामचंद्र आपले दैवत, श्रीमती मंदाताई नवरे यांची नित्यसेवा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दररोज सायंकाळी कीर्तन होईल. ४ तारखेला सायंकाळी ५ वाजता नृसिंह जयंतीचे जन्मकाळ कीर्तन, तसेच सायंकाळी अमृतधारा गीतमंच हुपरी यांचा भावगीत भक्ती गीतांचा कार्यक्रम होईल. ६ तारखेला ललिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल.

------------
गोविंदराव हायस्कूलमध्ये शिबिर
इचलकरंजी : गोविंदराव हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व आणि संस्कार शिबिर झाले. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकास होण्याच्यादृष्टीने शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात योगासन, अभिनय प्रशिक्षण, शिल्पकला, मूर्तिकला, प्रात्यक्षिक, हस्ताक्षर सुधार उपक्रम, गणितातील गंमतीजमती, शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांचा परिचय, संवाद कौशल्य, गायन वादन, संगीत क्षेत्रभेट आदी उपक्रम घेतले. बी. एस. माने, ए. आर. कोष्टी, आर. पी. कुलकर्णी, कपिल पिसे, एम. के. कुंभार, एस. जे. माणगावकर, पी. ए. सतार, व्ही. एस. कांबळे, शुभम जाधव यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी मुख्याध्यापक एस. एच. चिंचवाडे, उपमुख्याध्यापिका एस. एच. कवठे, पर्यवेक्षक एस. एस. तेली, आर. डी. पिष्टे, व्ही. एस. लोटके आदींचे सहकार्य लाभले.