Sat, Sept 23, 2023

ओंकारमध्ये कार्यशाळा उत्साहात
ओंकारमध्ये कार्यशाळा उत्साहात
Published on : 27 April 2023, 1:54 am
ओंकारमध्ये कार्यशाळा उत्साहात
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविदयालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात गृहशास्त्र विभाग व शारदा बेकर्सतर्फे दोन दिवशीय आईस्क्रिम मेकींग कार्यशाळा झाली. स्वयंप्रभा सरमगदूम अध्यक्षस्थानी होत्या. सीमा तोडकर प्रमुख पाहुण्या होत्या. राधिका नाईक यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षक निशा पाटील यांनी आईस्क्रिमचे विविध फ्लेवर, कुल्फीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर व प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. गंगासागर चोले यांनी प्रास्ताविक केले. कविता पोळ यांनी स्वागत केले. शीतल डवरी यांनी आभार मानले.