पश्चिम भागाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील

पश्चिम भागाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील

पश्चिम भागाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील
आमदार पाटील; खामदळे येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २७ ः तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ, दूर्गम आहे. या विभागात पावसाचे प्रमाणही जास्त आहे. येथील नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्यांची मला जाणीव आहे. त्यामुळे या विभागाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी दिले.
खामदळे (ता. चंदगड) येथे अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सभापती ज. गा. पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार पाटील म्हणाले, ``स्थानिक विकास निधीतून गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामांना प्राधान्य दिले आहे. ही कामे उत्कृष्ट दर्जाची करुन घेण्यासाठी ग्रामस्थांनी सजग रहावे.`` ज. गा. पाटील म्हणाले, ``माजी आमदार कै. नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्या कारकीर्दीपासून हा विभाग पाटील गटाशी जोडलेला आहे. त्यांच्या माध्यमातून या विभागातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. यापुढील काळातही या विभागाच्या विकासासाठी आमदार पाटील यांनी प्राधान्य द्यावे.`` आमदार पाटील यांच्याहस्ते रस्ता कामाचा प्रारंभ केला. मंगेश भोवर, विजय मोरे, सुजाता मोरे, संतोष पाटील, ग्रामसेवक मडव आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com