इंग्रजी भाषेमुळे रोजगाराच्या जागतिक संधी

इंग्रजी भाषेमुळे रोजगाराच्या जागतिक संधी

chd273.jpg
98979
चंदगड ः इंग्रजी भाषा दिन कार्यक्रमात मायाप्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
-----------------------------------------
इंग्रजी भाषेमुळे रोजगाराच्या जागतिक संधी
मायाप्पा पाटील; माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजी दिन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २७ ः इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. त्यामुळे ही भाषा रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करीत असल्याचे मत मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले.
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजी भाषा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.
मायाप्पा पाटील म्हणाले, `कोणत्याही भाषेची मधुरता ही उच्चार, मांडणी, शब्दांचा क्रम, योग्य शब्दांची निवड यावर ठरत असते. ही कौशल्ये आत्मसात केल्यास त्या भाषेवर प्रभुत्व प्राप्त होते.’ प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, `भाषेची सुंदरता व्यक्तीमत्व खुलवण्यास उपयुक्त ठरते. इंग्रजी भाषा त्यासाठी महत्वाची भूमिका निभावते.` प्रा. आर. के. तेलगोटे, डॉ. डी. ए. मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. एन. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. बी. दिवेकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. एस.सावंत, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. टी. एम. पाटील, प्रा. ए. डी. कांबळे उपस्थित होते. दिशा गवस यांनी आभार मानले. संजीवनी बावडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com