डाटा स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाटा स्टोरी
डाटा स्टोरी

डाटा स्टोरी

sakal_logo
By

डाटा रिसर्च

जिल्ह्यात दोन व्यक्तीमागे एक वाहन
-
सर्वाधिक १०.८३ लाख दुचाकींचा समावेश

निवास चौगले

कोल्हापूर ः जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार करता दोन व्यक्तीमागे एक वाहन अशी स्थिती आहे. विविध बँकांसह फायनान्स कंपन्यांकडून तत्काळ मिळणारे कर्ज, कमी हप्ता आणि डाउन पेमेंट, कमीत कमी कागदपत्रांची गरज आदी कारणांमुळे कोणतेही वाहन घेणे त्यातही दुचाकी घेणे सोपे झाले आहे. कोल्हापूरची लोकसंख्या अंदाजे ३८ ते ३९ लाख आहे, तर सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या १६ लाख ४३ हजार आहे. लोकसंख्या आणि वाहन यांचा विचार करता दोन व्यक्तीमागे एक वाहन अशी स्थिती आहे.

कोल्हापूर अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सधन
वातावरण, सुपीक जमीन, बारमाही दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, त्यावर अवलंबून असलेली हिरवीगार शेती, साखर कारखाने, गुऱ्हाळघरे अशा सर्वच बाबतीत कोल्हापूर अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सधन आहे. येथे हौसेला तर मोलच नाही. कोट्यवधी किमतीच्या गाड्या कोल्हापुरात पहिल्यांदा खरेदी करणारे व्यावसायिकही आहेत. फॅन्सी नंबरसाठी लाखो रुपये मोजणारेही कोल्हापूरकर आहेत. काही गाड्यांच्या नंबरवरून येथील संस्थानिक, राजकीय, मोठ्या व्यक्तींची ओळख निर्माण झाली आहे. वाहनांच्या वाढती संख्येला येथील वातावरणही कारणीभूत आहे.

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील वाहनांची संख्या
दुचाकी - १२, ८५, ०४७ (मोटारसायकल, मोपेड, स्कूटर)
मोटार कार - १,६७, ८९७
जीप - २०,६३२
स्टेशन वेगन्स - ६७
मीटर असलेली वाहने - ४२६
टुरिस्ट वाहने - १२२४
ऑटो रिक्षा - १६,६४६
स्टेज कॅरियर्स - ११८९
मिनीबस - २२३१
स्कूल बस - ६२९
खासगी सर्व्हिस वाहने - ३१८
रुग्णवाहिका - ५३१
ट्रक्स - २०,५४२
टँकर - ११४९
चार चाकी डिलिव्हरी व्हॅन - २९,३७८
तीन चाकी डिलिव्हरी व्हॅन - १२,६७२
ट्रॅक्टर्स - ४४,६१७
ट्रेलर्स - ३३,१६०
इतर - ४,३९७