संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

99014
नाभिक समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा
कोल्हापूर : आजच्या आधुनिक युगात नाभिक समाजातील मुला-मुलींसाठी वधू-वर मेळाव्याची गरज आहे. त्याशिवाय समाजाच्या मागण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. नाभिक युवक संघटनेतर्फे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. नाभिक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.आर. टिपुगडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद, मोहन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वधू-वर स्मरणिका प्रकाशित झाली. नाभिक समाज बोर्डिंगचे अध्यक्ष राजाराम शिंदे यांना ‘नाभिक समाजभूषण'' तर कृष्णा बामणे यांना ‘समाजगौरव पुरस्कार'' देण्यात आला. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांचा विशेष सत्कार झाला. दीपक खराडे, मारुती टिपुगडे, सुनील टिपुगडे, नारायण पोवार, सचिन यादव, विजय कोरे, सोमन गवळी, विकी सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
.............
महाकालीचा आज पालखी सोहळा
कोल्हापूर ः शिवाजी पेठेतील श्री महाकाली मंदिरातील उत्सवाची सांगता उद्या (शुक्रवारी) पालखी सोहळ्याने होणार आहे. सकाळी सहा वाजता नवचंडी होम, दुपारी बाराला महाप्रसाद आणि सायंकाळी सहा वाजता आतषबाजीसह सवाद्य भव्य पालखी सोहळा होणार आहे. उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महाकाली तालीम मंडळाने केले आहे.
...........
कदंब पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन
कोल्हापूर ः येथील कदंब महोत्सव समितीच्या वतीने यंदाही कदंब महोत्सवाचे आयोजन होणार आहे. यंदाच्या महोत्सवात काव्यप्रकारासाठी राज्यस्तरीय कदंब पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. एक जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेला काव्यसंग्रह पुरस्कारासाठी पात्र असेल. इच्छुकांनी काव्यसंग्रहाच्या दोन प्रतीसह प्रस्ताव महाराष्ट्र ग्रंथ भांडार (महाद्वार रोड, कोल्हापूर) या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष भेटून द्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.