बाजार समिती निवडणूक आदेश

बाजार समिती निवडणूक आदेश

... ‘तो’ मतदार एकादाच मतदान करेल
कोल्हापूर , ता. २७ ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत एकच व्यक्ती एकच मतदानाचा नुकताच दिलेले आदेश आज जिल्हा सहकार उपनिबंधकांनी आज अंशतः मागे घेत सुधारीत आदेश लागू केला. त्यानुसार एकाच मतदार संघात एकापेक्षा जास्त वेळा मतदारांचे नाव असेल तर तो मतदार एकाच वेळेला मतदान करेल. वेगवेगळ्या मतदार संघात एखाद्या मतदाराचे नाव असल्यास तर तो ज्या मतदार संघात त्यांचे नाव असेल तेथे प्रत्येक ठिकाणी तो मतदान करण्यास पात्र असेल. उदाहरणात एकच मतदार ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सेवा संस्थेत संचालक असेल तर तो दोन्ही ठिकाणी मतदान करेल. मात्र, विकास सेवा संस्था संचालक दोन किंवा दोन पेक्षा जास्त संस्थेत संचालक असेल तर तो मतदान एकदाच करेल, अशा सूचना निवडणूक केंद्राध्यक्षानी मतदान प्रक्रियेवेळी पाळाव्यात असेही या आदेशाचे म्हटले आहे.


चौकट
‘त्या’ आदेशांवर हरकत
एकच व्यक्ती एकच मतदानाचा आदेश सहकार निबंधकांनी बुधवारी काढला होता. या आदेशाचा फटका व्यापारी उमेदवारांना बसणार होता. उमदेवार कुमार आहूजा व वैभव सावर्डेकर यांनी आज जिल्हा सहकार उपनिबंधकांची भेट घेतली. यावेळी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आदेश काढला. तो आदेश योग्य व कायदेशीर मानावा कसा असे लेखी पत्र दिले. तसेच वरील आदेशामुळे अनेक मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या आदेशाचा फेरविचारकरून मतदारांना पूर्वीप्रमाणेच मतदान करण्यास मान्यता द्यावी असेही यापत्रात म्हटले होते. यानंतर जिल्हा सहकार उपनिबंधकांनी दुपारीच पहिला आदेश अंशतः मागे घेऊन सुधारीत आदेश काढला. तोही सायंकाळी बदलून आणखी नवा आदेश काढला.

चौकट
‘त्या’ गटाकरीता एकदाच मतदान
वरील सुधारीत आदेशानुसार एखाद्या मतदाराचे नाव एक मतदार यादीत किंवा संघात कितीही वेळा असले तरी त्या मतदारास त्या गटाकरीता एकदाच मतदान करता येईल. अशा सूचना निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक केंद्राध्यक्षानाही दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com