जिल्हा बँक तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बँक तपासणी
जिल्हा बँक तपासणी

जिल्हा बँक तपासणी

sakal_logo
By

जिल्हा मध्यवर्ती बँकेत
नाबार्डची नियमित तपासणी

कोल्हापूर, ता. २७ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नाबार्डकडून तपासणी केली जात आहे. बँकेचा ताळेबंद, कर्जपुरवठा, नाबार्डकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत का? या सर्वांची तपासणी होते.
दरम्यान, ही तपासणी नियमित केली जाणारी तपासणी आहे. ईडीकडून विविध तपासण्या झाल्यानंतर जिल्हा बँकेत आता नाबार्डकडून तपासणी केली जात असल्याची माहिती होती. मात्र, नाबार्डकडून नियमानुसार ठरलेल्या वेळेत अशा तपासण्या प्रत्येक सहकारी बँकांमध्ये होत राहतात. बँकांचा ताळेबंद किंवा कर्ज पुरवठ्याबद्दल माहिती घेतली जाते. त्यांची शासकीय नियमानूसार तपासणी केली जाते. यावरुन बँकेच्या कारभार कसा आहे, हेही तपासले जाते. आता केल्या जाणाऱ्या तपासणीमुळे विविध चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. ठेवीही सुरक्षित आहेत. बँकेच्या आर्थिक स्तरही सुधारत आहे. मार्च अखेर बँकेच्या सर्व शाखा नफ्यात आहेत. ही जमेची बाजू आहे.