चार गाड्यांचे टार्गेट पूर्ण

चार गाड्यांचे टार्गेट पूर्ण

महिला कुस्ती लढतीचे संग्रहित छायाचित्र वापरावे.

मंडलिक केंद्रातील महिला पैलवान ठरल्या लई भारी..!

चार दुचाकी गाड्यांच्या मानकरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : महिला महाराष्ट्र केसरीच्या मैदानात मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती केंद्रातील पैलवानांनी रग दाखवली. एक नव्हे तर चार दुचाकी गाड्यांच्या त्या मानकरी ठरल्या असून, उप महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला. ग्रामीण भागातील महिला पैलवांनात टॅलेंट कसे असते, याचा दाखलाच त्यांनी दिला. विशेष म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील पैलवानांनी मंडलिक कुस्ती केंद्राच्या लौकिक आणखी वाढवला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने राजर्षी शाहू खासबागेत महिलांनी शड्डू ठोकला. सुरवातीपासूनच स्पर्धेच्या अधिकृततेविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या. सांगलीत पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्याने खासबागेतील मैदानावर प्रश्‍नचिन्ह उमटले गेले. दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टने स्पर्धेत चारचाकी, दुचाकीसह सोन्याच्या दागिन्यांची बक्षीसे जाहीर केल्याने कुस्ती क्षेत्राचे कान टवकारले.
मुरगूडच्या मंडलिक कुस्ती केंद्राने कष्टपूर्वक मेहनत घेतली. महाराष्ट्र केसरी गदा व चारचाकीसह किमान पाच वजनी गटातील दुचाकी पटकावणे प्रशिक्षक दादा लवटे यांचे टार्गेट होते. महिला महाराष्ट्र केसरीची गदा व चारचाकी मिळविण्याचा त्यांचा संकल्प मात्र पूर्ण झाला नाही. अंतिम लढतीत ज्या जिल्ह्यातील पैलवान लढणार असतात, त्या जिल्ह्यातील पंचाने पंच म्हणून कामगिरी बजावायची नसते, असा नियम आहे. त्याला बगल दिली आणि लढतच वादग्रस्त ठरली. केंद्राच्या अन्य वजनी गटातील पैलवानांनी त्यांच्या अंगातील कौशल्य सिद्ध केले. चार गटात त्यांनी जेतेपद मिळवले, तर चार गटात त्या कास्यपदकाच्या मानकरी ठरल्या.

चौकट
दुचाकीच्या मानकरी....
नेहा चौगले (५० किलो), स्वाती शिंदे (५३ किलो), अंकिता शिंदे (५९ किलो), श्रावणी शेळके (६८ किलो).

चौकट
कास्यपदक पटकाविणाऱ्या महिला पैलवान...
मेघना सोनुले (५३ किलो), अंजली पाटील (५५ किलो), अस्मिता पाटील (६५ किलो), शिवानी मेटकर (६८ किलो).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com