शिवराज कॉलेजचे नॅक मूल्यांकन

शिवराज कॉलेजचे नॅक मूल्यांकन

GAD282.JPG
99107
गडहिंग्लज : नॅक समितीचे राकेशकुमार शर्मा, परमजीत कौर, धनुकुमार अंगडी यांच्याकडून डॉ. अनिल कुराडे, डॉ. एस. एम. कदम, प्रा. किशोर अदाटे, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांनी अहवाल स्वीकारला.
----------------------------------------------------------------------
शिवराज कॉलेजचे नॅक मूल्यांकन
गडहिंग्लज, ता. २८ : येथील शिवराज महाविद्यालयाच्या नॅक मुल्यांकनासाठी बंगळूर पीअर टिमचे प्रमुख प्रा. राकेशकुमार शर्मा, समन्वयिका प्रा. परमजीत कौर-धिंडसा, सदस्य डॉ. धनुकुमार अंगडी यांच्या समितीने भेट दिली. दोन दिवसांच्या या मूल्यांकनात समितीसमोर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रमाचे सादरीकरण केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, जे. वाय. बारदेस्कर, के. जी. पेडणेकर, बसवराज आजरी, शंकर नंदनवाडे, नॅक विभागाचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे उपस्थित होते. प्राचार्य कदम यांच्यासह विविध विभागातर्फे पेपर प्रेझेन्टेशन सादर केले. आजी-माजी विद्यार्थ्यांशी समितीने संवाद साधला. संगणक, ग्रंथालय, क्रीडा व एन.सी.सी., प्रशासन आदी विभागांची पाहणी केली. मल्लखांबची प्रात्यक्षिके झाली. महाराष्ट्रीय लोककला व लोकगीतांचे सादरीकरण केले. प्रा. शर्मा, प्रा. कौर, डॉ. अंगडी यांनी मार्गदर्शन केले. समितीने प्राचार्य डॉ. कदम व सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्याकडे अहवाल सुपूर्द केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com