प्रकाश आबिटकर पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश आबिटकर पत्रक
प्रकाश आबिटकर पत्रक

प्रकाश आबिटकर पत्रक

sakal_logo
By

‘पुनर्वसन’ च्या कामकाजाबाबत लवकरच
पालकमंत्र्यांसमवेत बैठक ःआबिटकर

कोल्हापूर, ता. २८ ः जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे पुनर्वसनाचे प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करणे व पुनर्वसन कार्यालयातील भोंगळ कारभाराला चाप लावण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यातील दूधगंगा (काळम्मावाडी) आंतरराज्य प्रकल्प, धामणी मध्यम प्रकल्प, सर्फनाला मध्यम प्रकल्प, नागनवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प, उचंगी प्रकल्प, आंबेओहोळ प्रकल्प, तुळशी, लोंढा नाला यासह अन्य लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पातील पुनर्वसनाचे प्रश्न गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या समवेत वेळोवेळी आढावा बैठका घेऊनही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे आहेत. पुनर्वसन कार्यालयाकडून प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनविषयक अर्धन्यायिक प्रकरणात सुनावणी घेणे, पुनर्वसनविषयक न्यायालयातील बाबी, प्रकल्पग्रस्तांना जमीन भूखंडाचे वाटप करणे, लाभक्षेत्रातील पुनर्वसन विषयक ना हरकत दाखले देणे, शैक्षणिक प्रमाणपत्र, प्रमाणित नकला यासह अन्य कामे केली जातात. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना नाहक त्रास होतो. यासंबधी आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १५ सप्टेंबरला चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सध्या प्रशासकीय पातळीवर काहीच कार्यवाही झालेली नाही. याबाबत लवकरच पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची बैठक घेतली जाणार आहे.