नगरोत्थान निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरोत्थान निधी मंजूर
नगरोत्थान निधी मंजूर

नगरोत्थान निधी मंजूर

sakal_logo
By

शहरातील १०५ विकासकामांसाठी
१९ कोटी ५० लाख रूपये मंजूर
 
कोल्हापूर, ता. २८ ः महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेतून शहरातील १०५ प्रस्तावित कामांच्या १९ कोटी ५० लाख रुपयाच्या अंदाजपत्रकास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रशासकीय मंजुरी दिली. जिल्हा नियोजनमधून दहा कोटींचा निधी दिल्यानंतर उर्वरित निधी तीन टप्प्यात नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार देण्यात येणार आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ साठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेतून १० कोटींचा निधी मंजूर आहे. त्यासाठी १९ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांनी सादर केला होता. त्यास जिल्हाधिकारी रेखावार यांनी मंजुरी दिली. मंजूर निधीच्या दीडपट वाढीच्या प्रस्तावानुसार देण्यात येणार आहे. महापालिकेला ३० टक्के प्रमाणे ४ कोटी ५० लाख रुपये भरावे लागणार आहेत. तर ७० टक्के प्रमाणे पंधरा कोटी रुपये प्रत्यक्ष योजनेतून मिळणार आहेत. पहिला ३३ टक्केचा टप्पा प्रकल्प मंजुरीनंतर दिला जाईल. पुढील ३३ टक्के रक्कम पहिल्या टप्प्याच्या अनुदानाच्या व त्याप्रमाणात महापालिकेच्या हिश्‍श्‍याची ७० टक्के रक्कम खर्च झाल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर मिळणार आहे. त्यानंतरची ३३ टक्के रक्कम पहिल्या दोन टप्प्याची व महापालिकेची रक्कम खर्च झाल्यानंतर देण्यात येणार आहे.