बाजार समिती निवडणूक २

बाजार समिती निवडणूक २

ही बातमी आतील पानासाठी
९९०९१, ९९०९२
....

बाजार समितीसाठी चुरशीने मतदान

कार्यक्षेत्रातील सहाही तालुक्यांत नव्वद टक्क्यांहून अधिक मतदान

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २७ : शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी चुरशीने मतदान झाले. राजर्षी शाहू शेतकरी आघाडी व शिव शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी अशा दोन पॅनेलमध्ये दुरंगी लढत झाली. त्यासाठी २१ हजार ९८८ मतदारांपैकी २० हजार २८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे शंभर टक्के मतदान झाले तर उर्वरित सर्व ठिकाणी ९२ ते ९५ टक्क्यांच्या पुढे मतदान झाले आहे.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रानुसार करवीर, भुदरगड, कागल, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यातील मतदान झाले. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, व्यापारी अडते, माथाडी अशा गटामधील उमेदवारांसाठी मतदान झाले. त्यांना ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था सदस्य, व्यापारी अडते सदस्य, माथाडी सदस्यांनी मतदान केले.
करवीर तालुक्यातील जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यालयातील मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान प्रतिसाद होता. सकाळी आठ वाजल्यापासून रांगा लागल्या. बहुतांशी उमेदवार पक्षीय कार्यकर्ते आहेत. त्यांना बळ देण्यासाठी पक्षीय नेत्यांच्या सूचनेनुसार पक्षीय कार्यकर्त्यांची फळीच जाधववाडी मतदान केंद्रावर तैनात होती. तेथे कार्यकर्ते दिवसभर उन्हात थांबून होते. मतदारांना संपर्क करण्यापासून मतदान क्रमांक काढून देण्याचे काम बूथवर सुरू होते.
...
व्यापारी माथाडी गटाची सोय  

जाधववाडी मतदान केंद्रावर व्यापारी, अडते, माथाडी कामगारांचे मतदान होते. या दोन्ही गटातील उमेदवार समर्थकांनी गेल्या तीन दिवसात व्यक्तिगत संपर्कातून मतदारांना जागृत केले होते. यात फळ व्यापारी, भाजीपाला व्यापारी, कांदा बटाटा व्यापारी, धान्य व्यापारी यांचे स्वतंत्र गट आहेत. त्या प्रत्येक गटाचे नेतृत्व करणाऱ्यांनी आपला उमेदवार निश्चित बैठका घेत चर्चेतून आपला उमेदवार ठरवला होता. त्या उमेदवारासाठी गठ्ठा मतदान जुळवून ठेवले होते. अशा व्यापारी अडते व माथाडी दोन्ही गटातील गठ्ठा मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी पहिल्याच टप्प्यात आले. त्यामुळे माथाडी गटात ९२ टक्के तर व्यापारी गटात ७५ टक्के मतदान झाले.    
 ...
विविध सेवा संस्था मतदार संघ

गट* जागा* उमेदवार
सर्वसाधारण*----- ७----------- १६
महिला प्रतिनिधी ---२ -----------४
इतर मागासवर्गीय ------- १ ----------३
विमुक्‍तजाती भटक्या जमाती-- १----२
...
ग्रामपंचायत गट
सर्व साधारण --- २ ------५
अनु.जाती जमाती ----१ -----३
आर्थिक दृष्‍ट्यादुर्बल ----१ ----२
अडते व्यापारी -----२ -----८
माथाडी मापाडी ----१ ----७
...
चौकट

‘त्या’ निर्णयाची अंमलबजावणी सुरळीत

बाजार समिती निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत सहकार निबंधक यांनी एकच व्यक्ती एकच मतदानाचा आदेश काढला. त्यावर व्यापारी, अडते गटातून जोरदार उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. हरकती दाखल झाल्या. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी सुधारित आदेश काढला. त्यानुसार एखाद्या मतदाराचे नाव एक मतदार यादीत किंवा संघात कितीही वेळा असले तरी त्या मतदारास त्या गटाकरीता एकदाच मतदान करता येईल. अशा सूचना निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक केंद्राध्यक्षानाही दिल्या. त्यानुसारच आजची मतदान प्रक्रीया सुरळीत झाली.
...

जिल्ह्यातील गटनिहाय मतदान संख्या अशी

गट असे ः मतदार संख्या ः झालेले मतदान ः टक्केवारी
विविध कार्यकारी सेवा संस्था गट -----१४१३२ ------ १३०३३ -------- ९२. २२
ग्राम पंचायत मतदार गट-------------- ५७४५-------- ५४५७ --------- ९४.९९
अडते व्यापारी गट ----------------------१२१७ ---------- ९१६ -------७५.२७
हमाल व तोलाईदार गट ------------------८९४ ----------- ८७४ ------९७.७६
एकूण ------------------------------२१९८८ -----------२०२८०--------९२.२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com