योगेश राणेला अटक

योगेश राणेला अटक

99248
...

पोलिस रेकार्डवरील गुंड योगेश राणेला अटक

ःमैत्रिणीच्‍या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ः खुनासाठी आणले पिस्तुल,जिवंत काडतूस

कोल्हापूर, ता. २८ ः पोलिस रेकॉर्डवरील गुंड योगेश राणे याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. खून करण्यासाठी त्याने त्याच्या मैत्रिणीकडे गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. बेकायदा अग्निशस्त्र जवळ बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे असेही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक इक्बाल महात यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, योगेश बाळासाहेब राणे (वय ३८, रा. बी.टी.कॉलेजजवळ, शाहूपुरी) हा पोलिस रेकॉर्डवरील गुंड आहे. तो मोक्का अंतर्गत कारागृहात होता. वर्षापूर्वी तो जामिनावर बाहेर आला आहे. या काळात त्याने त्याच्या मैत्रिणीकडे अतुल कल्याणकर यांचा खून करण्यासाठी गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस ठेवली होती. निपाणीच्या माळावर त्यांना आणून तेथे त्यांचा खून करण्याचा कट केला होता. तसेच खून करण्याची धमकीही दिली होती. ही माहिती पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना मिळाली. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना सूचना देवून मैत्रिणीला विश्‍वासात घेवून तिची फिर्याद घेतली. त्यानंतर पोलिसांकडून राणेला अटक करण्याची प्रक्रीया सुरू होणार हे समजताच त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. जिल्हा व सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्यामुळे अखेर राणेला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याच्या मैत्रिणीकडे असलेली पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती उपनिरीक्षक इक्बाल महात यांनी दिली. पोलिस निरीक्षक श्रीकृष्‍ण कठकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
--------

राणेची बी.टी.कॉलेज परिसरात दहशत

योगेश राणे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. साधारण तीन वर्षे तो कारागृहात होता. मागील वर्षी तो जामिनावर सुटल्यानंतर त्याने हा गुन्हा केला आहे. त्याची शाहूपुरी बी.टी.कॉलेज परिसरात दहशत आहे. त्याने ही गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस कोठून आणले, खुनाची सुपारी कोणी दिली आहे, यासह अन्य तपासासाठी न्यायालयातून पोलिस कोठडी मिळाल्याचेही तपास अधिकारी महात यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com